Punjab on high alert : पाकिस्तानातून ड्रोनने अमृतसरमध्ये टिफीन बॉंब ; स्वातंत्र्यदिनाआधी यंत्रणा अलर्टवर !


  • गावकऱ्यांच्या दक्षतेनंतर पंजाब पोलिसांनी शस्त्रे जप्त केली आहेत .

  • अमृतसरच्या ग्रामीण भागात हे बॉम्ब आढळून आले आहेत. यामध्ये हँडग्रेनेड, टिफीन बॉम्ब आणि काही काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. लहान मुलांच्या डब्यात IED ठेवून हा टिफीन बॉम्ब तयार करण्यात आला होता.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: पाकिस्तान त्याच्या नापाक कारवायांपासून परावृत्त होत नाही आणि जम्मू -काश्मीरनंतर आता ड्रोनच्या माध्यमातून पंजाबच्या अमृतसरच्या सीमावर्ती भागात शस्त्रांचा साठा पाठवला आहे. स्वातंत्र्यदिन (Independence Day) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पंजाबमधून (Punjab) ही खळबळजनक घटना समोर आली आहे.घातपाताच्या शक्यता पाहाता स्वातंत्र्यदिनाच्या आधी सर्व यंत्रणा अलर्टवर गेल्या आहेत.Punjab on high alert: Tiffin bomb in Amritsar by drone from Pakistan; System on alert before Independence Day!

अधिक माहिती देताना पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिनकर गुप्ता म्हणाले की, तपासादरम्यान सात बॅगमधून आयईडी, हँड ग्रेनेड आणि काडतुसे जप्त करण्यात आली.

अमृतसरजवळच्या गावातून 7-8 ऑगस्टच्या रात्री पोलिसांना ड्रोन दिसल्याची माहिती मिळाली आणि लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. यानंतर, पोलिसांना काही संशयास्पद वस्तू मिळाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला आणि शस्त्रे जप्त करण्यात आली.

अमृतसरमधील सीमेवर शस्त्रांचा साठा सापडल्यानंतर त्याची माहिती राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांना पाठवण्यात आली असून आसपासच्या भागात शोधमोहीमही राबवली जात आहे. गुप्ता म्हणाले की, पोलीस याबाबत अत्यंत सावध आहेत आणि जी काही माहिती मिळेल ती संबंधित एजन्सींसोबत शेअर केली जाईल.

गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पंजाब पोलिसांनी आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान पोलिसांनी आयईडी टिफिन बॉम्ब, पाच हँड ग्रेनेड आणि 100 हून अधिक काडतुसे जप्त केली.

2 किलो RDX चा टाईम बॉम्ब
पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार IED टिफीन बॉम्बमध्ये 2 किलो RDX लावण्यात आलेलं होतं. त्याला बटण बसवून हा टाईम बॉम्ब बनवण्यात आला होता. विशेष म्हणजे चुंबकाचा वापर करून हा बॉम्ब असा बनवण्यात आला होता की, हाताळण्यात थोडी जरी चूक झाली तरी बॉम्बचा स्फोट होईल. याशिवाय मोबाईल फोनच्या माध्यमातूनही बॉम्बचा स्फोट घडवणं शक्य होतं. शनिवारी पंजाब पोलिसांनी ड्रोनची संशयास्पद हलचाल टिपली होती. त्यानंतर रविवारी या परिसरात सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यानंतर ही स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याची योजना

पाकिस्तानातून पाठवण्यात आलेली ही स्फोटकं पंजाबमधल्या गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणार होती अशी माहिती दिनकर गुप्ता यांनी दिली आहे. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्रीही स्फोटकांच्या निशाण्यावर असू शकत होते असाही संशय पोलिसांनी व्यक्त केला. 2 किलो RDX चा स्फोट झाला असता तर त्यामुळे मोठं नुकसान झालं असतं. पण पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली.

Punjab on high alert : Tiffin bomb in Amritsar by drone from Pakistan; System on alert before Independence Day!

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात