आमदार कपिल पाटील, डॉ. गणेश देवी यांचा राष्ट्र सेवा दलात मनमानी कारभार, पदाधिकाऱ्यांचा आरोप ; क्रांती दिनी पुरस्कार केले परत


वृत्तसंस्था

पुणे : राष्ट्र सेवा दलावर आमदार कपिल पाटील आणि भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी बेकायदा कब्जा केला आहे, असा आरोप माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रकाश कांबळे यांनी केला. तसेच पाटील आणि देवी यांनी मर्जीतील पदाधिकारी नेमल्याच्या कृतीचा निषेध करण्यासाठी दलाच्या पदाधिकाऱ्यांनी आज ९ ऑगस्ट क्रांती दिनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना मिळालेले सर्व पुरस्कारही परत केले. Serious allegations on MLA Kapil Patil and Dr Ganesh Devy by Rashtra Seva Dal activist

लोक भारतीचे आमदार आणि सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त कपिल पाटील आणि राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी हे नियमांना केराची टोपली दाखवत असून आपल्या मर्जीतील लोकांना संघटनेवर लादत आहेत, असा आरोप राष्ट्र सेवा दलाच्या माजी अध्यक्ष कांबळे आणि अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांचा आहे. कपिल पाटील यांनी राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी गणेश देवींमार्फत संघटनेवर बेकायदा कब्जा केला आहे, असा आरोपही कांबळे यांनी केला. तसेच या कृतीचा निषेध करण्यासाठी आज पदाधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेले पुरस्कार परत केले.“कपिल पाटील कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रत्यक्ष बैठका टाळत आहेत. त्यांनी आमदारकीचा प्रभाव टाकत पोलीस यंत्रणेवर दबाव आणला. यातून त्यांनी सेवादल सैनिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी सर्व सेवादल सैनिक सनदशीर मार्गाने सेवादल वाचविण्याच्या लढा सुरूच ठेवतील,” असंही या पत्रकार परिषदेत नमूद केले. यावेळी सेवादल सैनिक मिहीर थत्ते, सुहास कोते, जीवराज सावंत आदी महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

“प्रश्न विचारणारे कार्यकर्ते संघटनेबाहेर”

“आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कपिल पाटील यांनी अडचणीचे ठरणाऱ्या ज्येष्ठ सेवादल विश्वस्त व पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं बेकायदा निलंबन केलं. प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेबाहेर घालवलं. कपिल पाटील व गणेश देवी हे सेवादलात मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत,” असाही आरोप कांबळे यांनी केला.

“ देवींच्या मनमानीच्या निषेधार्थ पुरस्कार परत”

आदर्श कार्यकर्ता पुरस्कारप्राप्त श्रीकांत लक्ष्मी शंकर म्हणाले, “देशातील लोकशाही, राज्यघटना वाचविण्याची सदैव भाषा बोलणारे भाषातज्ञ गणेश देवी लोकशाहीविरोधी, मनमानी पद्धतीने काम करत आहेत. या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी २५ ते ३० वर्षे सेवादलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते अत्यंत नाईलाज आपले पुरस्कार आज परत करत आहेत.”

“राष्ट्र सेवा दलात बनावट सभासद नोंदणी करण्यात आली. सेवादल सदस्य नसताना गणेश देवी यांना थेट राष्ट्रीय अध्यक्ष केले. आमदार कपिल पाटील यांनी मर्जीतील लोकभारती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सेवादलाचे पदाधिकारी म्हणून नेमले. कपिल पाटील यांनी सेवादल संघटनेत अवाजवी, बेकायदा हस्तक्षेप केला. राजकीय फायद्यासाठी सेवादलाचा गैरवापर सुरू केला आहे.
– प्रकाश कांबळे, माजी अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल

Serious allegations on MLA Kapil Patil and Dr Ganesh Devy by Rashtra Seva Dal activist

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण