पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्या; सीबीआयचं ठाकरे सरकारला पत्र

वृत्तसंस्था

मुंबई : पुणे-सातारा मार्गावरील टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्या, अशी मागणी सीबीआयने ठाकरे सरकारला पत्र पाठवून केली आहे. आरटीआय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने ठाकरे सरकारला परवानगीसाठी पत्र पाठवले आहे. Allow Pune Satara Toll Plaza To Be Investigated CBI Letter To Thackeray Government

पुणे-सातारा मार्गावरील नाक्यावर १ जानेवारी २०१६ पासून रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर टोलवसुली करत आहे.ती बेकायदा आणि नियमांचं उल्लंघन करुन होत आहे. ही वाहनचालकांची फसवणूक आहे, अशी तक्रार आम्ही सीबीआयकडे गेलो होतो. सीबीआयने त्यावर प्राथमिक चौकशी केली. नियमात बदल झाल्याने सीबीआयने गुन्हा नोंद करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मागितली आहे.



एवढी मोठी फसवणूक चालू असताना गेल्या दोन -तीन महिन्यांपासून राज्य सरकार सीबीआयला परवानगी न देता अडून बसलं आहे. अशी माहिती आरटीय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

टोलवसुली थांबविण्याची सातत्याने मागणी

दरम्यान, प्रवीण वाटेगावकर यांनी तत्काळ टोलवसुली थांबविण्याची मागणी सातत्याने केली आहे. मात्र, दरवर्षी रिलायन्सला टोलवाढीचे बक्षीस दिले जात आहे. याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Allow Pune Satara Toll Plaza To Be Investigated CBI Letter To Thackeray Government

महत्तवाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात