विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: इस्रायलच्या एनएसओ समूहाविरोधात पेगासिस स्पायवेअरच्या माध्यमातून फोन टॅपिंग केलेल्या यादीतील असलेल्या १७ पत्रकारांनी पॅरिसमध्ये तक्रार दाखल केली आहे. पाच भारतीय पत्रकारांचाही यामध्ये समावेश आहे. हे सर्व पत्रकार रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेमध्ये दाखल झाले असून हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांकडे पाठविले आहे.Journalist’s complaint against NSO group in Pegasis espionage case, involving five people from India
भारतातून सिद्धार्थ वरदराजन, एम. के. वेणू, सुशांत सिंह, शुभ्रांशू चौधरी आणि स्वाती चतुवेर्दी या ज्येष्ठ पत्रकारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या १७ पत्रकारांमध्ये भारत आणि मेक्सिकोतील प्रत्येकी ५, अजरबैजान आणि हंगेरीचे २, मोरोक्को, टोगो आणि स्पेनमधील प्रत्येकी एका पत्रकाराचा समावेश आहे.
आरएसएफ आणि मोरोक्कोच्या दोन पत्रकारांनी २० जुलै रोजी पॅरिसमध्ये तक्रार दाखल केली होती. पत्रकारांना लक्ष्य करून छळ करणा?्यांचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली होती. हे प्रकरणदेखील संयुक्त राष्ट्रांकडे पाठविण्यात आले होते.
ह्यपेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आलेल्या यादीत भारतातील ४० पत्रकारांची नावे उघड करण्यात आली होती. तर या स्पायवेअरचा वापर करून वरदराजन, वेणू आणि सिंह यांचे फोनची सुरक्षा भेदण्यात आल्याचे फॉरेन्सिक चाचणीत उघड झाले होते.
अनेक देशांमधील पत्रकारांच्या फोनमध्ये हे स्पायवेअर टाकण्यात आले आहे. याप्रकरणात जे कोणी गुंतलेले आहेत, त्याचा शोध घेतला पाहिजे. संबंधित देशांमधील सरकारने किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती उघड करायला हवी. या प्रकरणावरुन पडदा उचलायला हवा आणि न्याय मिळाला पाहिजे, असे ह्आरएसएफने म्हटले आहे.भारतातून पाच पत्रकारांनी यापूर्वीच सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App