चोरीस गेलेल्या मूर्तींसारख्या वारसा वस्तू परत भारतात आणण्यात यश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध राष्ट्रप्रमुखांशी स्नेह आला कामी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पुरातन मूर्तींपासून अनेक वस्तूंची स्मगलींग करून परदेशात नेण्याचे अनेक प्रकार चित्रपटांत पाहिले असतील. परदेशातील श्रीमंतांच्या घराचे सौंदर्य या वस्तू वाढवितात. समृध्द भारतीय संस्कृतीच्या वारशाची ओळख असलेल्या या वस्तू परत आणण्यासाठी आत्तापर्यंतची सरकारे प्रयत्नही करत नव्हती.Success in bringing back heritage items like stolen idols to India, Prime Minister Narendra Modi’s good relation with various heads of countries helps

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी असलेल्या स्नेहाचा वापर करून या वारसा वस्तू परत मिळविल्या आहेत.रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचे श्रेय देताना म्हटले की, मोदी यांच्या अथकप्रयत्नांनी विदेशांतून या वस्तू परत मिळाल्या आहेत.



माझे म्हणणे असे आहे की, हे यश आमच्या सतत सुधारत असलेल्या सांस्कृतिक संबंधांमुळे आणि आमच्या पंतप्रधानांच्या वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांशी असलेल्या घनिष्ठ व्यक्तिगत संबंधांमुळे शक्य झाले आहे.

भारतातून चोरीला गेलेल्या वारसा वस्तूंपैकी ७५ टक्के परत मिळविण्यात नरेंद्र मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात यश आले आहे, असे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेड्डी म्हणाले की, १९७६ पासून आतापर्यंत विदेशांतून एकूण ५४ वस्तू परत आणण्यात आल्या आहेत.

ते म्हणाले, आमच्या अनेक चोरीला गेलेल्या वारसा वस्तूंना विदेशांतून परत मिळविण्यात आम्ही सक्षम ठरलो, ही अभिमानाची बाब आहे. गेल्या सात वर्षांत जप्त केलेल्या पुरावशेषांची संख्या आतापर्यंतची सर्वात जास्त आहे. २०१४ नंतर भारतात ४१ वारसा वस्तू परत आणल्या गेल्या आहेत. त्या एकूण परत केल्या गेलेल्या वस्तूंपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत.

Success in bringing back heritage items like stolen idols to India, Prime Minister Narendra Modi’s good relation with various heads of countries helps

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात