मुसलमान शेजारी आले आणि संपूर्ण कॉलनीतील रहिवाशांनी आपली घरे विक्रीसाठी काढली, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील प्रकार


विशेष प्रतिनिधी

मुरादाबाद : पश्चिम उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एका कॉलनीतील दोन घरे मुसलमान व्यक्तींना विकल्याने येथील सगळ्या रहिवाशांनी आपली घरे विक्रीसाठी काढली आहेत. कॉलनीतील सर्व घरांवर घर विक्रीसाठी आहे अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. आम्ही सर्व जण सामुहिक पलायन करत आहाते. ही मालमत्ता विक्रीसाठी आहे. कृपया संपर्क साधावा अशी पोस्टर्स घरावर लावण्यात आली आहेत.Muslim neighbors came and residents of the entire colony took out their houses for sale, insident in Moradabad in Uttar Pradesh

लाजपत नगर परिसरातील शिवमंदिर कॉलनीत हा प्रकार घडला आहे. येथील जवळजवळ प्रत्येक दारावर एक गेल्या आठवड्यापासून अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळील दोन मालमत्ता मुस्लिम व्यक्तींना विकल्याचा दावा करण्यात येत आहे.



याबाबत रहिवाशांचे म्हणणे असे आहे की, ‘ते’ त्यांच्या भागात राहतील आणि आम्ही आमच्या भागात राहू, असे आत्तापर्यंत परस्परसंमतीने ठरले होते. त्यांना जबरदस्तीने येथे येऊन वातावरण खराब करण्याची इच्छा का आहे? आपल्या संस्कृती वेगळ्या आहेत. आपले सण वेगवेगळे आहेत जे आपण आपल्या पद्धतीने साजरे करू इच्छितो. ते त्यांच्या सणांच्या वेळी कुबार्नी करतील. पण त्यांच्या भागात केले तर आमची आमची हरकत नाही.

या सगळ्याचा निषेध म्हणून रहिवासी दररोज कॉलनीतील शिवमंदिरात जमतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावरही एक बॅनर लावण्यात आले आहे. येथील सर्वच्या सर्व घरे विक्रीसाठी आहेत असे त्यावर म्हटले आहे. मंदिराचे संरक्षण करण्यासाठीही या पध्दतीने निषेध केला जात आहे,असे सांगण्यात आले आहे.

सुमारे ३३ वर्षांपासून येथे राहत असलेले विवेक शर्मा म्हणाले, आम्ही ऐकले आहे की त्यांनी ही मालमत्ता दुप्पट चौपट दराने विकत घेतली आहे. ते मुरादाबादमध्ये कोठेही मालमत्ता खरेदी करू शकतात. मग त्यांनी येथेच या मालमत्ता का खरेदी केल्या? शर्मा यांना किंमतीबद्दल कसे समजले असे विचारल्यावर ते म्हणाले, असेच असणार आहे.

कारण आमच्यापैकीही अनेक जण या मालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक अहेत. मग मुस्लिम व्यक्तींनाच त्या का विकल्या. आम्ही या मालमत्ता खरेदी करण्यास तयार आहोत.
या प्रकाराची दखल घेऊन प्रशासनाने चौकशी केली. जिल्हाधिकारी शैलेंद्रकुमार सिंह यांनी सांगितले, ज्यांनी मंगळवारी मुरादाबाद एसएसपीसह परिसराला भेट दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलनीमध्ये 81 घरे आहेत. दोन घरांच्या मालकांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांची मालमत्ता मुस्लीम समाजातील लोकांना विकली. सोमवारी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपास केला. त्या घरात कोणीही राहत नाही आणि त्यांना बाहेरून कुलूप आहे.

आम्ही लोकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की कोणीही कोणालाही त्यांची मालमत्ता कोणत्याही व्यक्तीला विकण्यापासून रोखू शकत नाही. काही स्थानिक रहिवाशांना या मालमत्ता खरेदी करायच्या होत्या. मात्र, त्या आधीच विकल्या गेल्यामुळे हा प्रकार घडविला जात आहे.

यावर कॉलनीतील रहिवाशांनीही पोलीसांना एक निवेदन दिले आहे. रहिवाशांच्या संमतीशिवाय कोणीही आपल्या मालमत्ता बाहेरील लोकांना विकू नयेत हा आमचा अधिकार असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.पोलीसांनी म्हटले आहे की, काही लोक सोशल मीडियाद्वारे मुद्दामून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल

Muslim neighbors came and residents of the entire colony took out their houses for sale, insident in Moradabad in Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात