महाराष्ट्रभर पुढील आठवड्यापासून पुन्हा चांगला पाऊस कोसळणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई – राज्यात ९ ते १९ ऑगस्ट या कालावधीत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. ऑगस्टमध्ये १५० ते १७५ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. Heavy rain in Maharashtra from next week

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबावाचा पट्टा तयार झाल्याने सध्या मध्यप्रदेशात अतिवृष्टी होत आहे. मॉन्सूनचा हा पाऊस महाराष्ट्रात मध्यप्रदेश पाठोपाठ सुरु होईल. हा पाऊस सर्वदूर राहील. या पावसामुळे धरणातील जलसाठा वाढून बरीच धरणे भरण्याची शक्यता आहे.



नाशिक विभागाचा अपवाद वगळता राज्यात इतरत्र गेल्यावर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नाशिक विभागात आतापर्यंत ७२.१ टक्के पाऊस झाला असून गेल्यावर्षी ११०.५ टक्के पाऊस झाला होता. इतर विभागातील आतापर्यंतचा आणि गेल्यावर्षी झालेल्या पावसाची टक्केवारी अनुक्रमे अशी – कोकण-१३४.१ (८६.१), पुणे-१११.८ (७१.५), औरंगाबाद-१३५.३ (१२४.६), अमरावती-१११.९ (१०७.२), नागपूर-९९.८ (८४).

Heavy rain in Maharashtra from next week

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात