विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – अनेक मातब्बर कंपन्या आपला आयपीओ जाहीर करत असतानाच आता पेटीएमनेही बाजारात आपला आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत १६ हजार कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यास इच्छुक असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.Pay TM will launch its IPO
कंपनीने यासाठी १५ जुलै रोजीच सेबीकडे कागदपत्रे सोपवल्याची माहिती आहे. सप्टेंबरपर्यंत सेबीकडून आयपीओला परवानगी मिळण्याची आशा कंपनीला आहे. त्यानंतर लवकरात लवकर शेअर बाजारात कंपनीची नोंदणी करण्यास प्रयत्न केले जाणार आहेत.
पुढील दोन महिन्यांत सेबी कागदपत्रांची पडताळणी करणार आहे. तसे झाल्यास येत्या ऑक्टोबरपर्यंत कंपनीचा आयपीओ जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वीच गुंतवणूकदारांना त्यात गुंतवणूक करता येणार आहे. २०२० मध्ये पेटीएमला २४६८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आता त्यात घट होत असून गेल्या मार्चमध्ये हा तोटा १६५५ कोटी रुपयांपर्यंत आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App