फास्टॅग यंत्रणेतून जादा टोल गेल्यास पेटीएम मिळवून देणार रिफंड; २.६ लाख वाहनचालकांना मिळाले पैसे परत

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील सर्व टोल नाक्यांवर फार्स्टग अनिवार्य केले आहे. फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार आहे. मात्र, काही वेळा फास्टॅग असतानाही जादा पैसे घेतले जातात. मात्र, आता पेटीएमच्या माध्यमातून जादा घेतले गेलेले पैसे परत मिळू शकणार आहेत.Fastag to repay for wrong toll charges, till 2.6 lakh customers got refund

फास्टॅगमधून जादा पैसे घेतले गेले असतील तर रिफंडसाठी सरकारने अनेक बॅँका आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशनला मंजुरीदिली आहे. यामध्ये पेटीएमने आघाडी घेतली आहे. पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत २.६ लाख फास्टॅग ग्राहकांना रिफंड मिळवून दिला आहे.पेटीएम पेमेंटरस बॅँकचे व्यवस्थापकीय संचालक सतीश गुप्ता यांनी सांगितले की टोल नाक्यावर टोल संदर्भातील प्रत्येक तक्रारीवर पेटीएम ग्राहकांना मदत करत आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने फास्टॅगसाठी कमीत कमी बॅलन्सची अटही मागे घेतली आहे.

त्यामुळे आता फास्टॅग असल्यास कोणालाही दुप्पट टोल भरण्याच भुर्दंड पडणार नाही. पेटीएमने यासाठी फास्ट रिड्रेसल मॅकॅनिझम तयार केले आहे. यामध्ये टोल नाक्यावर चुकीच्या पध्दतीने पैसे कापले गेले असल्यास तातडीने ही चूक लक्षात येते. त्यानंतर हे पैसे परत मिळावेत यासाठी पेटीएमकडून टोल नाक्याकडे क्लेमही जातो.

Fastag to repay for wrong toll charges, till 2.6 lakh customers got refund

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*