विशेष प्रतिनिधी
मुंबई : केवळ अमराठी तरुणांनाच नोकरी अशी जाहिरात देणाऱ्यां वागळे इस्टेटमधील एका गुजराती कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. मनसेचे शहरप्रमुख रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कंपनीकडून केवळ अमराठी तरुणांनाच नोकरीची संधी का दिली जात आहे असा सवाल केला.MNS agitation against Gujarati company which advertises jobs only to non marathiyouth
मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीकडे याबाबत खुलाशाची मागणी केली. यावेळी कंपनीकडून सांगण्यात आले की मुख्य कार्यालयाकडून ही जाहिरात देण्यात आली आहे. आम्हाला याबाबत काहीही माहिती नाही. याबाबत रवींद्र मोरे म्हणाले, या कंपनीने केवळ अमराठी तरुणांनीच नोकरीसाठी अर्ज करावा अशी जाहिरात केली होती.
याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यावर तातडीने कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापन गयावया करायला लागले की आम्हाला याबाबत काहीही माहिती नाही. आमच्या कंपनीत ८० टक्के कामगार हे मराठी आहेत. त्यांनी असेही सांगितले की यापुढे कंपनीमध्ये जी भरती होईल त्यामध्ये मराठी तरुणांनाच प्राधान्य दिले जाईल.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांचे मुख्य कार्यालय बडोदा येथे आहे. ही जाहिरात तेथील मनुष्यबळ विकास विभागाने दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की केवळ अमराठी तरुणांनाच नोकरीमध्ये प्राधान्य दिले जाईल. याबाबत बडोदा येथील मनुष्यबळ विभाग कार्यालयाकडून माहिती आल्यावरच याबाबत अधिक बोलता येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App