मा, माटी, मानूषवरून ममता आल्या प्रादेशिक वादावर; म्हणाल्या, कोणी गुजराती बंगालवर राज्य नाही करू शकत!!

वृत्तसंस्था

हुगळी : मा, माटी, मानूषच्या मुद्द्यावर १० वर्षांपूर्वी डाव्यांच्या हातून बंगालची सत्ता हिसकावून घेणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनजी आता बंगाली – गुजराती प्रादेशिक वादावर येऊन ठेपल्या आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना त्यांनी प्रादेशिक लेबले लावत कोणीही गुजराती माणूस बंगालवर राज्य करू शकत नाही, अशा दुगाण्या झोडल्या आहेत.Bengal will rule Bengal Gujarat will not rule Bengal Modi will not rule Bengal Gundaswill not rule West Bengal CM Mamata Banerjee in Hooghly

हुगळीच्या रॅलीत आज ममतांनी फुल्ल बॅटिंग करून घेतली. गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लागोपाठ बंगाल आणि आसामचे दौरे करून राजकीय वातावरण निर्मिती केली आहे.त्याला हुगळीच्या रॅलीत ममतांनी बंगाल विरूध्द गुजरात असा प्रादेशिक रंग दिला. मोदी आणि शहा यांची गुजराती अशी संभावना करीत ते बंगालवर राज्य करू शकत नाहीत. कोणी बंगालीच येथे राज्य करू शकतो, असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच झालेल्या सभेत ममता सरकारला “टोलाबाज” सरकार म्हटले होते. ममतांनी त्याला आज प्रत्युत्तर देताना मोदी आणि शहांना “दंगाबाज” आणि “धंदाबाज” अशा शेलक्या शब्दांमध्ये टार्गेट केले.

या दोन्ही शब्दांनी ममतांनी गुजरात दंगे आणि मोदी – शहांच्या व्यापारी वृत्तीचा सूचकपणे उल्लेख करून बंगाली अस्मितेला हात घातला. बंगालवर राज्य करण्याचा अधिकार फक्त बंगाल्यांचा आहे. कोणा गुंडांचा, दंगाबाजांचा किंवा धंदाबाजांचा नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

मोदी – शहा आणि ममता यांचे एकमेकांवर वार – प्रहार दिवसेंदिवस तिखट होत चालले आहेत. त्याचा प्रत्यय आज हुगळीच्या रॅलीत आला. मोदी – शहांच्या भाजपशी लढताना ममतांनी एकीकडे बंगाली अस्मितेला कुरवाळण्याचा वेगळा प्रयत्न केला तर दुसरीकडे मोदी – शहा जरी संपूर्ण देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री असले, तरी त्यांच्या गुजराती प्रादेशिकतेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

डाव्यांशी लढताना ममतांनी मा, माटी, मानूषचा नारा दिला होता. ते प्रादेशिक अस्मितेचा वेगळे राजकीय स्वरूप होते. पण मोदी – शहांशी लढताना ते स्वरूप पुरेसे ठरणार नाही, हे लक्षात आल्यावर ममतांनी बंगाली विरूध्द गुजराती असा प्रादेशिक वाद उभा करण्याचा प्रयत्न चालविल्याचे यातून दिसते.

Bengal will rule Bengal Gujarat will not rule Bengal Modi will not rule Bengal Gundaswill not rule West Bengal CM Mamata Banerjee in Hooghly

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*