वृत्तसंस्था
गांधीनगर : देशात हिंदू मुलींना फूस लावून धर्मांतर करायचे व लग्न करायचे त्यानंतर सोडून द्यायचे, अशी लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत. अशातच एका प्रकरणात आणि फसण्याच्या मार्गावर असलेल्या गुजरातमधील हिंदू तरुणीने आपल्या मुस्लिम प्रियकराला लग्नासाठी अजब अट घातली. You first accept Hinduism, I am ready for marriage, Condition from a Hindu girl to a Muslim lover; Incidents in Gujarat
तुझे माझ्यावर खरोखरच प्रेम आहे तर आपण नक्की लग्न करू. पण तुझे प्रेम खरे असेल तर तू प्रथम हिंदू धर्म स्वीकार कर, त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, अशा आशयाचे पत्र गुजरातमधील हिंदू तरुणीने आपल्या मुस्लिम प्रियकराला पाठविले आहे. मुस्लीम मुलासोबत लग्न करण्यासाठी एखाद्या हिंदू मुलीने तिचा धर्म, संस्कृती सर्वकाही सोडून मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं आपण अनेकदा ऐकलं आणि बघितलं असेल. मात्र, गुजरातमध्ये मुस्लीम-हिंदू विवाहासंबंधी हे एक अनोखं प्रकरण समोर आलं. एका हिंदू मुलीने पोलिसांकडे एक अर्ज दाखल केला, की ती मुस्लीम मुलाशी लग्न करेल पण एका अटीवर जर त्याने हिंदू धर्म स्वीकारला तरच मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे.
गुजरातच्या सुरत येथील कतारगाम येथे ही घटना घडली आहे. मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलगी हे दोघे २२ एप्रिलला घरातून पळून गेले. त्यानंतर ते ननपुराच्या मॅरेज रजिस्टारच्या कार्यालयात लग्न करण्यासाठी गेले. पण, तिथे मुलीचे नातेवाईक पोचले. त्यामुळे हे दोघेही तिथूनही पळून गेले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.काहीच दिवसांत पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही एक दिवसानंतर सोडून दिलं. ते दोघेही बालिक होते. मुलीचं वय १८ पूर्ण होतं. त्यामुळे ते दोघे त्यांचे निर्णय घेण्यास समर्थ आहेत, असं सांगत पोलिसांनी या दोघांनाही सोडून दिलं.
त्यानंतर मुलगी तिच्या घरी गेली. एका दिवसानंतर कतारगाम पोलिसांना त्या मुलीने एक अर्ज पाठवला. “आम्ही दोघेही लग्नासाठी तयार होतो, पण त्यासाठी एक अट होती. ती अट आताही आहे. त्याने हिंदू धर्म स्वीकारावा आणि शाकाहारी व्हावं, तरच मी त्याच्याशी लग्न करेन”, असं त्या अर्जात लिहिलं होतं. या अर्जाची एक प्रत त्या मुस्लीम मुलालाही पाठवली आहे, असेही त्यात स्पष्ट करण्यात आलं होतं. कतारगाम पोलीस ठाण्याचे उप पोलिस निरीक्षक ए. आर. राठोड यांनी याबाबतची माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App