डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने, भारतीय रोखीचा मोहन सोडून करू लागले डिजिटल व्यवहार, जुलै महिन्यात झाला विक्रम


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. या स्वप्नाची पूर्ती होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. जुलै महिन्यात देशात तब्बल ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत. Towards the fulfillment of the dream of Digital India, the temptation to abandon Indian cash and start digital transactions, a record was set in July

कंपन्या, दुकानदार आणि नागरिक डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. जुलै महिन्यात ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांचा विक्रमी डिजिटल व्यवहार झाला आहे. ३२४ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. भारताने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही यंत्रणा विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन ऑ फ इंडिया डिजिटल व्यवहार वाढावे यासाठी प्रयत्नशील आहे.

मे २०२१ मध्ये २५३ कोटी देवाणघेवाणीच्या माध्यमातून ४ लाख ९० हजार ६३८ कोटी रुपयांचा व्यवहार झाला. जून २०२१ मध्ये २८० कोटी देवाणघेवाणीच्या माध्यमातून ५ लाख ४७ हजार ३७३ कोटी रुपयांचा व्यवहार झाला. जुलै २०२१ मध्ये ३२४ कोटी देवाणघेवाणीच्या माध्यमातून ६ लाख ०६ हजार २८१ कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता.

मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी केल्यानंतर ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. काळ्या पैशांवर अंकुश लावण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डिजिटल व्यवहारांना चालना दिली जात आहे. सरकारच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत.

Towards the fulfillment of the dream of Digital India, the temptation to abandon Indian cash and start digital transactions, a record was set in July

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात