पॉर्न चित्रपट प्रकरणात कुंद्राच्या कार्यालयावर छापा ; पॉर्न सामग्री अपलोड करणारा सर्व्हर जप्त

मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये पॉर्न चित्रपट बनवून काही अ‍ॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा हे मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे मिळाल्याप्रकरणी शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली. Raid on Kundra’s office in porn movie case: Server uploading porn content seized

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री गुन्हे शाखेने अटक केली. पॉर्न मूव्ही प्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी सायंकाळी मुंबईतील व्हिएन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यालयावर तसेच राज कुंद्राच्या काही इतर ठिकाणी छापा टाकला होता . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कुंद्राच्या कार्यालयतील काही संगणकांची हार्ड डिस्क व सर्व्हर जप्त करण्यात ले आहे.दावा असा आहे की येथून व्ही व्ही ट्रान्सफरद्वारे व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहे.

याशिवाय इतर काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांनी राज कुंद्राचा आयफोन आणि लॅपटॉपही जप्त केला आहे. हे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबवर पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिस लवकरच अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी करू शकतात. राज कुंद्रा यांना 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.याशिवाय त्याचा मेहुणा प्रदीप बक्षी याच्याविरूद्ध ‘लुकआउट’ नोटीसही बजावण्यात आली आहे.मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बक्षी हा या प्रकरणातील आरोपी आहे. बक्षी हा केनरीन कंपनीचा सह-मालक आहे जो हॉटशॉट तयार करतो. राज कुंद्रा पॉर्न चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला पॉर्न चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

राज कुंद्राने या पॉर्न चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. या प्रकरणी त्याला २३ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. पॉर्न व्यवस्थापित करण्यासाठी दरमहा 3-4 ते लाख रुपये आकारले जात होते. तपासणीतून असे समोर आले आहे की, हॉटशॉटनी एका दिवसात 50 हजार ते 10 लाख रुपये कमवत असे.

Raid on Kundra’s office in porn movie case: Server uploading porn content seized

महत्त्वाच्या बातम्या