विशेष प्रतिनिधी
बगदाद – इराकच्या उत्तर भागात अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ला सलाहद्दीन प्रांतात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.ISIS terrorist attaked on funral
मृतांत पोलिसांचाही समावेश आहे. इराकी सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सशस्र दहशतवाद्यांनी अंत्ययात्रेत सामील होणाऱ्या नागरिकांची बेछूट गोळीबार केला. हा हल्ला इसिसने केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मृतांच्या संख्येला त्यांनी दुजोरा दिला नाही. तपासणी पूर्ण झाल्यानंतरच माहिती दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले.दहशतवाद्याचे हे निघृण कृत्य पाहता इराकमधील स्थीती किती भीषण झाली आहे हे यावरून दिसते असे मर राजकरीय निरीक्षकांनी नोंदविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App