भारत-बांग्ला देशमध्ये संवादाचे नवे पर्व : रेल्वे लिंकवरून वाहतूक सुरू


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : भारत आणि बांग्ला देशमध्ये संवादाचे नवे पर्व सुरू झाले आहे. भारत-बांगलादेशमधील हल्दीबाडी-चिलाहाटी रेल्वे लिंकवर रविवारपासून व्यावसायिक गतिविधी सुरू होणार असून, पहिली मालगाडी शेजारी देशात दाखल होत आहे.New Indo-Bangla Dialogue: Traffic on Railway Link

१९६५ पासून बंद असलेला हा रेल्वेमार्ग मागील वर्षीच्या डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी १७ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या रेल्वेमागार्चे उद्घाटन केले होते.



आता हल्दीबाडी व चिलाहाटी दरम्यान पहिली मालगाडी रविवारी धावणार आहे. हल्दीबाडीहून खडी घेऊन मालगाडी बांगलादेशच्या निफामाडी जिल्ह्यातील चिलाहाटीमध्ये दाखल होईल. या रेल्वे लिंकबरोबरच दोन्ही देशांत आणखी पाच रेल्वे लिंकचे संचालन होणार आहे.

हल्दीबाडीहून आंतरराष्ट्रीय सीमेचे अंतर ४.५ किलोमीटर तर चिलाहाटीहून झिरो पॉइंटचे अंतर ७.५ किलोमीटर आहे. भारत आणि पाकिस्तानच्या युध्दात १९६५ मध्ये हा मार्ग बंद करण्यात आला होता.

मात्र, बांग्ला देशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने हा मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आला होता. या मार्गावर सुरूवातीला मालवाहतूक आणि नंतर प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. आसाम आणि बंगालमधील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.

New Indo-Bangla Dialogue: Traffic on Railway Link

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!