विशेष प्रतिनिधी
सातारा : कोयना धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात आज अखेर ७२.८८ टीएमसी पाणीसाठा :झाला आहे. शुक्रवारी ( ता. २३ )जुलै रोजी धरणातून नदीपात्रात १०००० क्युसेक्स वेगाने पाण्याचा होणार विसर्ग केला जाणार आहे.Koyna Dam 72.88 TMC water storage
आज २२ जुलै रोजी संध्या. ५ वाजता धरणातील पाणी पातळी २१३३ फूट २ इंच झाली असून धरणामध्ये ७२.८८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची सांडवा पातळी २१३३ फूट ६ इंच असून या पातळीस पाणीसाठा ७३.१८ टीएमसी आहे.
पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.तर उद्या २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता कोयना धरणातून नदीपात्रात एकूण १०००० क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार आहे.
पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App