Karnataka CM Yediyurappa : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वृद्धापकाळा व प्रकृती अस्वास्थ्य ही राजीनामा देण्याची कारणे सांगितली जात आहेत. दरम्यान, दस्तुरखुद्द सीएम येडियुरप्पा यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. येदियुरप्पा यांनी राजीनामा देण्याच्या चर्चांना अफवा म्हटले आहे. Karnataka CM Yediyurappa likely to Resign Soon Know Why and Who Will Be Next CM
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वृद्धापकाळा व प्रकृती अस्वास्थ्य ही राजीनामा देण्याची कारणे सांगितली जात आहेत. दरम्यान, दस्तुरखुद्द सीएम येडियुरप्पा यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. येदियुरप्पा यांनी राजीनामा देण्याच्या चर्चांना अफवा म्हटले आहे.
दुसरीकडे, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्रिपदावर राहणे त्यांच्यासाठी शक्य नाही. शुक्रवारी पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीत त्यांनी या कारणांचा हवाला देऊन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. आज त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. येथेही येडीयुरप्पा यांनी आपला मुद्दा पुन्हा सांगितला. यानंतर पक्ष श्रेष्ठींनी त्यांना आश्वासन दिले आहे की, लवकरच कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्यांविषयी निर्णय घेण्यात येईल. लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. तोपर्यंत येदियुरप्पा त्यांच्या पदावर कायम राहतील. येदियुरप्पा यांनीही हाय कमांडसमोर एक अट ठेवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजीनामा देण्याच्या बदल्यात त्यांनी आपल्या मुलासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात पदाची मागणी केली आहे.
येडियुरप्पा यांच्यानंतर कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय एक-दोन दिवसात होईल. मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले सर्वात प्रमुख नाव म्हणजे प्रह्लाद जोशी. प्रल्हाद जोशी हे मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आहेत. ते उत्तर कर्नाटकचे खासदार आहेत. प्रल्हाद जोशी यांच्यानंतर बीएल संतोष हे दुसरे मोठे नाव आहे. बीएल संतोष हे बराच काळ संघटनेचे मंत्री आहेत आणि सध्या ते भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री आहेत. खूप चांगले प्रशासक मंत्री मानले जातात. याशिवाय उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी, भाजप नेते मुरगेश निरानी आणि वसवराज एटल हेही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.
सन 2018 मध्ये, कर्नाटकमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण भाजपचा स्वत:चा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. दुसर्या वेळी केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कर्नाटकमध्ये भाजप सक्रिय झाले. कर्नाटकमध्ये कॉंग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी राजीनामा दिला. यानंतर भाजपने अविश्वास ठराव आणला आणि 26 जुलै 2019 रोजी बीएस येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. गेल्या कित्येक महिन्यांपासून येडीयुरप्पा यांच्या कामाविषयी तक्रारी केल्या जात आहेत, त्यानंतर कर्नाटक भाजपाचे प्रभारी अरुण सिंह गेल्या महिन्यात कर्नाटकात गेले होते. अरुण सिंह सीएम येडियुरप्पा आणि कर्नाटकच्या इतर मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आले होते.
कर्नाटकमध्ये विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत, भाजप 119 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण ते बहुमतापेक्षा किंचित कमी होते. कॉंग्रेसने 68 आणि जेडीएसने 32 जागा जिंकल्या. इतरांच्या खात्यात दोन जागा आल्या होत्या.
Karnataka CM Yediyurappa likely to Resign Soon Know Why and Who Will Be Next CM
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App