विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वबळाचा नारा देणारे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीतच धू धू धुतले. त्यांच्या स्वबळाच्या नाऱ्या ची खिल्ली उडविली.In the presence of Balasaheb Thorat, QAshok Cavan the Chief Minister mocked Nana Patole, ridiculed the slogan of self-reliance.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्याची खिल्ली उडविताना उधदव ठाकरे म्हणाले, ‘कोरोनाची भीती बाळगू नका, बाळासाहेब, आम्हीही स्वबळावर येऊ, स्वबळावर म्हणजे चालत येऊ’.
मुंबईमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अशोक चव्हाण , पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते.
स्वबळाच्या नारेबाजीवरही उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. ते म्हणाले, आता जेवणाचा विषय निघाला चांगलं झालं, कोरोनाची भीती बाळगू नका बाळासाहेब, आम्ही सुद्धा स्वबळावर येणार, स्वबळावर म्हणजे आम्ही स्वत: चालत येऊ, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहत नाना पटोले यांना टोला लगावला.
अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी स्थापन झाली तेंव्हा एकोपा निर्माण व्हावा यासाठी नवा पायंडा पाडला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांना एकत्र जेवणं दिलं. मग मी सर्वांना एकत्र जेवण दिलं. पण, मी आता अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या निमंत्रणाची वाट बघतोय.अजित पवारांनी निमंत्रणाचं विचारताच, यावेळी लगेच अशोक चव्हाण यांनी अहो, कोरोना आहे सध्या’ असं म्हणताच सभागृहात पुन्हा एकच हशा उडाला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App