Navjot Sidhu likely to join Aam Aadmi Party : पंजाबच्या मुख्यमंत्र्यावर सातत्याने हल्ला चढवणारे कॉंग्रेसचे आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आम आदमी पार्टीचे (आप) कौतुक करून नवीन राजकीय समीकरणांकडे इशारा केला आहे. तीन दिवसांपूर्वी आपवर टीका करणाऱ्या सिद्धूंनी आता त्यांची राजकीय स्तुती करत गुगली फेकून सर्वांना चकित केले आहे. सिद्धू यांनी मंगळवारी ट्विट केले की, पंजाबमधील विरोधी पक्ष आपने कायम त्यांचे व्हिजन आणि कामाची कदर केली आहे. 2017 मध्ये अपमान, ड्रग्ज, शेतकरी आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न असो वा राज्यातील सद्य वीज संकट किंवा आता मी जे पंजाब मॉडेल सादर करीत आहे, त्यांना माहिती आहे की खरंच कोण पंजाबसाठी लढा देत आहे. Navjot Sidhu likely to join Aam Aadmi Party, Tweeted AAP Always Recognized My Work And Vision
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्र्यावर सातत्याने हल्ला चढवणारे कॉंग्रेसचे आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आम आदमी पार्टीचे (आप) कौतुक करून नवीन राजकीय समीकरणांकडे इशारा केला आहे. तीन दिवसांपूर्वी आपवर टीका करणाऱ्या सिद्धूंनी आता त्यांची राजकीय स्तुती करत गुगली फेकून सर्वांना चकित केले आहे. सिद्धू यांनी मंगळवारी ट्विट केले की, पंजाबमधील विरोधी पक्ष आपने कायम त्यांचे व्हिजन आणि कामाची कदर केली आहे. 2017 मध्ये अपमान, ड्रग्ज, शेतकरी आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न असो वा राज्यातील सद्य वीज संकट किंवा आता मी जे पंजाब मॉडेल सादर करीत आहे, त्यांना माहिती आहे की खरंच कोण पंजाबसाठी लढा देत आहे.
तीनच दिवसांपूर्वी पंजाबमधील थर्मल प्लांट बंद करण्याच्या दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या याचिकेवर सिद्धू यांनी टीका केली होती. ते म्हणाले होते की, पंजाबमध्ये थर्मल प्लांट बंद व्हावेत, अशी आपची इच्छा आहे. पंजाबमधील विजेच्या संकटामुळे पंजाबवासीयांना त्रास सहन करावा लागतोय आणि शेतकर्यांच्या पिकाचेही नुकसान होत आहे.
सिद्धू यांनी ट्विटसह जुना न्यूज व्हिडिओदेखील जोडला आहे. ज्यामध्ये राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर आपच्या वतीने पंजाबमध्ये त्यांच्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये आपचे नेते संजय सिंह त्यांचे कौतुक करत आहेत. सिद्धूंच्या धाडसी निर्णयाचे आणि पावलाचे त्यांनी स्वागत केले आहे.
सिद्धू आणि त्यांची पत्नी अकाली दलाचा भ्रष्टाचार, औषध माफिया, शेतकर्यांच्या दुर्दशाविरोधात आवाज उठवत आहेत. याच व्हिडिओमध्ये आपचे पंजाबचे अध्यक्ष भगवंत मान सिद्धूंचे कौतुक करताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या रोल मॉडेलपेक्षा कोणीही मोठे असू शकत नाही. सिद्धू पक्षात आले तर त्यांचे स्वागत करणारा मी पहिला असेन.
पंजाब कॉंग्रेसमध्ये अजूनही वाद सुरू आहेत. पक्षश्रेष्ठींच्या समितीनंतर सीएम कॅप्टन अमरिंदर सिंग कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले. यानंतरही कोणताही तोडगा निघाला नाही. सध्याच्या कॅप्टन सरकारमध्ये ते कोणतेही पद घ्यायला तयार नाहीत, असे सिद्धूंबद्दल सतत बोलले जात आहे.
पंजाबमधील राजकीय गणिताकडे पाहता कॉंग्रेसला कोणत्याही शीख चेहर्याला पंजाबचे अध्यक्षपद देण्याची इच्छा नाही. अशा परिस्थितीत सिद्धू यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्याची चर्चा सुरू होती. असे असूनही अद्यापपर्यंत संपूर्ण संकटावर हा उपाय असल्याचे दिसत नाही. यामुळे सिद्धू या माध्यमातून एखादा राजकीय संकेत तर देत नाहीत ना, अशी चर्चा सुरू आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल पंजाब दौर्यावर दाखल झाले होते. येथे त्यांनी जाहीर केले होते की, पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास फक्त शीखच मुख्यमंत्री होतील. यादरम्यान त्यांनी सिद्धूंचे कौतुकही केले. ते म्हणाले- ते कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो.
Navjot Sidhu likely to join Aam Aadmi Party, Tweeted AAP Always Recognized My Work And Vision
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App