NCP Leader Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी वारंवार तपासाला सामोरे जावे लागत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचा आरोप पत्राद्वारे केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे. तेव्हापासून ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. ईडीने समन्स बजावल्यावर कोरोनाचे कारण देऊन टाळणारे गृहमंत्री अनिल देशमुख आता अचानक दिल्लीला रवाना झाले आहे. यामुळे हाकेच्या अंतरावरील ईडी कार्यालयात जाणे टाळून दिल्लीला जाणाऱ्या देशमुखांवर टीकेची झोड उठली आहे. NCP Leader Anil Deshmukh Went Delhi amid ED And CBI Inquiry on 100 Crore Corruption Case
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी वारंवार तपासाला सामोरे जावे लागत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचा आरोप पत्राद्वारे केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे. तेव्हापासून ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. ईडीने समन्स बजावल्यावर कोरोनाचे कारण देऊन टाळणारे गृहमंत्री अनिल देशमुख आता अचानक दिल्लीला रवाना झाले आहे. यामुळे हाकेच्या अंतरावरील ईडी कार्यालयात जाणे टाळून दिल्लीला जाणाऱ्या देशमुखांवर टीकेची झोड उठली आहे.
अनिल देखमुख यांना चौकशीसाठी ईडीने समन्स धाडले होते. मात्र त्यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगच्या माध्यमातून जबाब नोंदवू असे म्हटले होते. पण आता अचानक अनिल देशमुख हे दिल्लीत रवाना झाले आहेत. यामुळे आता जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे अनिल देशमुख दिल्लीकडे रवाना झाले हे अद्याप अस्पष्टच आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल आपल्याविरोधात सुरू असलेली सीबीआय चौकशी बेकायदेशीर आणि कायदेशीर प्रक्रियेचा भंग आहे. २६/११ चा दहशतवादी अजमल कसाबलाही कायद्याची मदत मिळू शकते तर मला काही नाही? असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देताना देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.एम. जमादार यांच्या खंडपीठासमोर अमित देसाई युक्तिवाद करत होते.
देशमुख यांचे वकील ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयात सांगितले की एप्रिल महिन्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी सुरू केली गेली. मात्र, खटला भरण्यासाठी सीबीआयने महाराष्ट्र सरकारकडून पूर्व परवानगी घेतली नव्हती. या मंजुरीअभावी भ्रष्टाचार आणि गैरवर्तन या आरोपावरून देशमुख यांच्याविरूद्ध चौकशी बेकायदेशीर आहे.
दुसरीकडे, ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखही अडचणीत आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहून केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांनाही ईडीने अटक केली आहे.
ईडीच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले. त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला, जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनींच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानाच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यांत परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारतां येत नाही.
एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा.
ईडीने न्यायालयात म्हटले, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटूंबियांच्या थेट मालकीच्या ११ कंपनी आहेत. या कंपन्यांची आपआपसात पैशांची देवाणघेवाण होत होती. पैशांच्या व्यवहाराला काहीही ठोस कारण असल्याचे आढळून आले नाही. याचाच अर्थ हा पैसा हेरफार केला जात होता. यातील चार कंपन्यांचे संचालक असलेल्या विक्रम शर्मा यांनी अशी माहिती दिली की त्यांची कंपनी बनवण्यासाठी ऋषिकेश देशमुख यांनी पैसे दिले होते. या कंपन्यांत मी संचालक होतो याची मला माहिती ही नव्हती.
NCP Leader Anil Deshmukh Went Delhi amid ED And CBI Inquiry on 100 Crore Corruption Case
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App