विशेष प्रतिनिधी
हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असून आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे, अशी चिंता ऑम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.Amnesty International targets China
हाँगकाँगमध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ २०१९ मध्ये भव्य निदर्शने झाली, ज्यास काही वेळा हिंसक वळण मिळाले. त्यानंतर स्थैर्य निर्माण करण्याच्या उद्देशाने चीनने कडक कायदा कला आहे. त्याचा वापर लोकशाही मुल्यांची मागमी करणाऱ्यांविरद्ध केला जात आहे.
लोकशाहीवादी चळवळीचा बीमोड करण्याच्या उद्देशाने चीनने हा कायदा लागू केला आहे. एका वर्षात या कायद्यामुळे पोलिसांचा अंमल असलेल्या प्रांतात हाँगकाँगचे रूपांतर झाले आहे. तेथे राहणाऱ्या लोकांच्या मानवी हक्कांबाबत आणीबाणीची स्थिती निर्माण होणे चिंताजनक आहे.
ब्रिटनने १९९७ मध्ये हस्तांतर केल्यापासूनचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता कायम ठेवू अशी ग्वाही चीनने दिली होती. प्रत्यक्षात पोलिसांनी राजकीय भाषणे देणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना जेरबंद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App