
विशेष प्रतिनिधी
पुणे : श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पूना हॉस्पिटल समोर नदीपात्रातील समाधी स्थळाची दुरावस्था झाली आहे. शहरातील तमाम लोकप्रतिनिधींना शरमेने मान खाली घालावी लागेल, अशी ही घटना आहे, अशा शब्दात कात्रज येथील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली.
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची मंगळवारी (ता. २९) पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी समाधी स्थळाच्या परिसराची पाहणी केली. तेव्हा त्यांना विदारक दृश्य पहायला मिळाले. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा समाधीस्थळ परिसर दुर्लक्षित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Samadhi place of rich Nanasaheb Peshwa Crisis: MNS corporator Vasant More
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पुण्यात १४ बागा ३ मोठी तळी अनेक बाजार पेठा वसवल्या. शनिवारवाडा बांधला, पर्वती उभारली, सोमेश्वर मंदिर, बनेश्वर मंदिर, विठ्ठलवाडी मंदिर जीर्णोद्धार, कात्रज पाणीपुरवठा योजना राबवली. पण, पुण्यात भाजपाची सत्ता आली तेव्हा जल्लोष शनिवारवाड्यावर केला. त्यानंतर पुण्याशी निगडित ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपले जाईल, अशी आशा पल्लवित झाली होती. पण झालंय उलटं. मंगळवारी (ता. २९ ) नानासाहेब पेशवे यांची पुण्यतिथी आहे . त्यामुळे मी मुद्दामून पूना हॉस्पिटल समोरच्या नदीपात्रातील त्यांच्या समाधी स्थळाला भेट दिली. तेव्हा समाधी स्थळाचे विदारक दृष्य समोर आले आणि लोकप्रतिनिधी म्हणून मान शरमेने खाली गेली. विशेष म्हणजे या प्रभागातून भाजपाचे ३ नगरसेवक (एक दिवंगत आहेत) निवडून आले असताना समाधी स्थळाची इतकी वाईट अवस्था का आहे, असा प्रश्न मला पडला. सुसंस्कृत पुण्यात श्रीमंतांच्या समाधीची अवस्था पाहून अतिशय दुःख वाटले. त्यामुळे मी सर्व लोकप्रतिनिधिंचा जाहीर निषेध करतो, असे वसंत मोरे यांनी म्हंटले आहे.
Samadhi place of rich Nanasaheb Peshwa Crisis: MNS corporator Vasant More
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात निवडणुका स्वबळावर लढण्याची बुवा – भतीजाची घोषणा
- जॉर्डनमध्ये सापडले ११ हजार वर्षापूर्वीचे जगातील पहिले धान्य कोठार
- करोनावरील सध्याची लस डेल्टा प्लसलाही भारी पडणार
- अखेर जॉन्सन अँड जॉन्सनने भरले २३ कोटी डॉलर्स आणि सोडवून घेतली मान
- मैत्रिणींबरोबर पार्टी करणाऱ्या तरुणीला बाटलीभर दारुसाठी ६१ हजारांचा गंडा