अमेरिकेच्या अध्यक्षांच्या मुलाने रशियन कॉलगर्लवर उधळले १८ लाख रुपये, ज्यो बायडेन यांना मोजावी लागली किंमत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या मुलाने कॉलगर्लवर १८ लाख रुपये उधळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यो बायडेन यांन पुत्र रॉबर्ट हंटर बायडन यांच्या भानगडीची किंमत मोजावी लागली. तब्बल २५ हजार डॉलर (१८ लाख रुपये) जो बायडन यांच्या खात्यातून हंटर यांनी एका रशियन कॉलगर्लला चुकते केले. मे २०१८ मध्ये काही दिवस हंटर यांनी एका रशियन कॉलगर्लसोबत घालविले. या सर्व भानगडीचा उलगडा हंटर यांच्या लॅपटॉपमधून झाला, असे न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.US President’s son spends Rs 18 lakh on Russian call girl, Joe Biden has to pay the price


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या मुलाने कॉलगर्लवर १८ लाख रुपये उधळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यो बायडेन यांन पुत्र रॉबर्ट हंटर बायडन यांच्या भानगडीची किंमत मोजावी लागली.

तब्बल २५ हजार डॉलर (१८ लाख रुपये) जो बायडन यांच्या खात्यातून हंटर यांनी एका रशियन कॉलगर्लला चुकते केले. मे २०१८ मध्ये काही दिवस हंटर यांनी एका रशियन कॉलगर्लसोबत घालविले. या सर्व भानगडीचा उलगडा हंटर यांच्या लॅपटॉपमधून झाला, असे न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.



हंटर हे लॉस एंजिल्समधील चटाऊ मॉरमन्ट हॉटेलात मुक्कामाला होते. रॉब या नावाने हंटर यांनी याना नावाच्या महिलेला आपली ओळख करून दिली. नंतर ही महिला या हॉटेलात पोहोचली. दोघांनी मद्यप्राशन केले आणि सोबत व्हिडिओही चित्रित केला. त्यानंतर हंटर यांनी तिला आपल्या वडिलांच्या खात्यातून पैसे चुकते केले, असा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे.

एम्रॉल्ड फॅन्टसी गर्ल्स या एजन्सीकडून हंटर यांनी याना या रशियन महिलेची निवड केली. हंटर यांच्यासोबत यानाने काही दिवस घालविले. नंतर यानाने ८ हजार डॉलर (५ लाख रुपये) मागितले. तेव्हा डेबिट कार्ड काम करीत नसल्याचे हंटर यांच्या लक्षात आले. त्यांनी अनेकदा प्रयत्नही केला;

परंतु, सकाळपर्यंत डेबिट कार्डवरून व्यवहार झाला नाही. अखेर हंटर यांनी दुसऱ्या कार्डचा वापर करून यानाला पैसे दिले. नंतर हंटर यांच्या ध्यानात आले की, आधी यानाला न पोहोचलेली रक्कम प्रत्यक्षात तिच्या खात्यात वळती झाली होती.

हंटर यांच्या लॅपटॉपमधून मिळालेल्या नोंदीनुसार सुरुवातीला ८ हजार डॉलर, नंतर २ हजार डॉलर चुकते करण्यात आले. नंतर सकाळी ११ वाजता पुन्हा ३५०० डॉलर, ८ हजार डॉलर आणि पुन्हा ३,५०० डॉलर वेगवेगळ्या वेळी चुकते करण्यात आले. असे एकूण २५ हजार डॉलर एका तासाच्या आत वळते झाले होते.

हंटर हे आपला लॅपटॉप एका दुकानावर विसरले होते. हा लॅपटॉप एफबीआयच्या हाती पडला. लॅपटॉपच्या तपासणीनंतर या व्यवहाराचा उलगडा झाला. हा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर त्या कॉलगर्लने हंटर यांना संदेश पाठवून पैसे मिळाल्याचे कळविले. हंटर यांच्या म्हणण्यानुसार, हा आर्थिक व्यवहार केल्टीक अकाउंटमधून झाला होता. जो बायडन हे उपराष्ट्राध्यक्ष (२००९-२०१७) होते, तेव्हा त्यांचे गोपनीय सेवेनुसार केल्टीक हे सांकेतिक नाव होते.

US President’s son spends Rs 18 lakh on Russian call girl, Joe Biden has to pay the price

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात