विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – भारतात कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लशीचे डोस देण्यात येत आहेत. लस दिल्यानंतर शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडिज) तयार होण्यासाठी कोव्हिशील्ड लस कोव्हॅक्सिनपेक्षा जास्त प्रभावी असल्याचे एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे. मात्र या दोन्ही लशी कोरोनाप्रतिबंधासाठी प्रभावशाली असल्याचे निरीक्षणही नोंदविले आहे.Covishield better than covaxine
भारतातील लसीकरणाच्या परिणामकारकतेसंबंधी जे थोडे फार संशोधन झाले आहे, त्यापैकी हे एक आहे. डॉक्टरांनी एकत्रित केलेल्या या संशोधनात सहभागी झालेल्या डॉक्टरांपैकी एकही जण दोन लशी घेतल्यानंतर आजारी पडलेला नाही. जानेवारी ते मे २०२१ या काळात सर्वेक्षण झाले.
यात १३ राज्यांतील २२ शहरांमधील ५१५ आरोग्यसेवकांच समावेश होता. शरीरात निर्माण झालेल्या प्रतिपिंडांचे प्रमाण तपासण्यासाठी रक्ताचे नमुनेही तपासण्यात आले. ५१५ पैकी ९० आरोग्यसेवकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. याच निष्यर्ष असे आले.
कोव्हिशील्डच्या एका डोसनंतर शरीरात प्रतिपिंडाची पातळी कोव्हॅक्सिनपेक्षा दहापटीने जास्त होती. दुसऱ्या डोसनंतर यातील अंतर काही प्रमाणात कमी होते प्रतिपिंड निर्मितीसाठी कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशील्ड सहा पटीने परिणामकारक आहे.
ज्यांनी कोव्हिशील्डचे दोन डोस घेतले होते, अशांमध्ये प्रतिपिंडाचे प्रमाण ९७.८ टक्के तर कोव्हॅक्सिन घेतलेल्यांमध्ये हे प्रमाण ७९.३ टक्के होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App