वृत्तसंस्था
मुंबई : पावनखिंड या चित्रपटाची वाट कोरोनाने अडवून ठेवली आहे. हा चित्रपट १०जूनला प्रदर्शित होणार होता. पण, चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे तो रिलीज झालेला नाही. Pavankhind Marathi Movie Will Only Be Released In Theater
विविध ऐतिहासिक घटनांवर चित्रपट करून अवघ्या रसिकांना इतिहासाची ओळख करून देण्याचा विडा बॉलिवूडने उचलला आहे, असे वाटते. पद्मावत, पानिपत, बाजीराव मस्तानी, तानाजी, फतेशिकस्त या पाठोपाठ आता बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर पावनखिंड हा चित्रपट तयार झाला आहे. लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लॅाकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. परंतु अद्याप राज्यात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग ‘पावनखिंड’ या चित्रपटात दाखविला गेला आहे. हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.
WATCH : HBD नवाजुद्दीन, डेटवर मुलीसमोर रडू लागला अन् तोच सीन सिनेमात हिट झाला
पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला लढा पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
चित्रपट संपूर्ण तयार आहे, पण करोनाचं सावट अद्याप गेलं नाही म्हणून रसिकांना थोडी कळ सोसावी लागणार आहे. चित्रपटगृहांचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याचे आदेश मिळताच ‘पावनखिंड’च्या प्रदर्शनाची योजना आखण्यात येणार आहे. या चित्रपटातील वैशिष्ट्यं टप्प्याटप्प्यानं रसिकांसमोर येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App