निवडणुकीतील पराभवामुळे केरळच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना डच्चू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसने केरळचे प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांची उचलबांगडी करून लोकसभेचे सदस्य असलेले के. सुधाकरन यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राज्यात नवे नेतृत्व देताना खासदार के. सुधाकरन यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमताना जोडीला तीन कार्यकारी अध्यक्षही नियुक्त केले आहेत. यामध्ये लोकसभेतील उपनेते असलेले के. सुरेश, विधानसभेतील आमदार पी. टी.थॉमस आणि टी. सिद्दीकी यांचा समावेश आहे. यापूर्वी रामचंद्रन यांच्यासोबत कार्याध्यक्ष असलेले माजी केंद्रीय मंत्री प्रा. के. व्ही. थॉमस यांनाही निरोप देण्यात आला आहे. Kerala state congress chief removed



केरळमधील वायनाडचे खासदार असलेल्या राहुल गांधींनी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र डाव्या आघाडीसमोर आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या प्रतिमेसमोर काँग्रेसची डाळ शिजली नाही. त्यातच पक्षांतर्गत कलहाचीही भर पडली होती. केंद्रीय संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना प्रादेशिक राजकारणात केंद्रीय नेतृत्वाकडून दिले जाणारे अवाजवी महत्त्व हे त्यामागचे कारण असल्याचे बोलले जाते.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी नेमलेल्या अशोक चव्हाण समितीनेही संघटनात्मक बळकटीसाठी बदलांची शिफारस केली होती.

Kerala state congress chief removed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात