मेंदूचा शोध व बोध : अफाट क्षमतेच्या तेजतर्रार मेंदूमुळेच माणूस सर्व प्राण्यांत वेगळा

माणूस माणूस का आहे याचे विश्लेषण करताना संशोधक, शास्त्रज्ञ मानवाच्या बुद्धीमत्तेपर्यंत येऊन पोहचतात. संशोधक जुली डिलाशे याही त्यापैकीच एक. त्या सध्या व्हर्जिनिया विद्यापीठात माणूस इतर प्राण्याहून वेगळा कसा आहे, Man is different from all other animals because of his brilliant brain

जर तो बुद्धीमत्तेच्या जोरावर वेगळा असेल तर तो का आणि कशाप्रकारे वेगळा आहे याबद्दल संशोधन करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार गोरीला विचार करतो तसा आपण विचार करतो पण त्यात खुप साऱ्या अधिक बाबी आणि क्षमता असतात. म्हणजे असे की पेरूच्या झाडांच्या पानांसारखी पाने दिसली तर ते झाड गोरीलाला पेरुचे वाटते. पण माणसाने ते झाड बघितले तर ही पेरूची पाने आहेत हे तर माणूस ओऴखतोच पण त्या झाडाला लाल, पांढरा, मस्त गोलाकार रंगाचा वा कुठल्या इतर प्रकारचा पेरू येत असेल का याचे निरीक्षण माणूस करू शकतो. शिवाय नक्की हे पेरूचेच पान आहे का कुठल्या इतर झाडाचीही पाने पेरूप्रमाणे असतात असाही विचार करू शकतो.

म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर माणूस समोर जे काही आहे ते तर साऱ्या निरिक्षणावरून समजून घेतोच. मात्र त्याशिवायही त्या वस्तूप्रमाणे असणारी अन्य कुठल्याही इतर वस्तूंच्या शक्यतेचा विचार करतो. ही माणसाकडे असणारी क्षमता आहे. शिवाय त्याही पुढे जाऊन माणूस शक्यतांबाबत कल्पना करू शकतो. डलाशे यांनी हिच गोष्ट वेगळ्या शब्दात मांडली त्या म्हणतात कुठल्याही वेळच्या विश्लेषणाची ताकद, क्षमता माणसाकडे आहे तीच देणगी आहे. माणसाला अस्तित्वात असणाऱ्या वस्तू लक्षात येतातच शिवाय त्यांच्यासारख्या दिसू शकतील अशा वस्तूंची कल्पना करणे, चित्रांचे, प्रतिकृतींचे वैशिष्ठ्यानुरूप अर्थ काढणे माणसालाच जमते. नव्हे ती त्याची या उत्कांतीच्या काळात निर्माण झालेली क्षमता आहे.

अस्तित्वात असलेल्या गोष्टी आपण मानतो आणि आता समोर अस्तित्वात नसलेल्या गोष्टींवर कल्पनाही करू शकतो. म्हणूनच आपण माणूस आहोत. यासाठीच जर आपण कल्पना करत असाल तर ते आपणासाठी नक्कीच हितावह आहे हे लक्षात घ्या. नेहमी वेगवेगळ्या कल्पना , शक्यता यांचा विचार करा.

Man is different from all other animals because of his brilliant brain