भारतीय जनता पक्षा उत्तर प्रदेशात निवडणुकांची तयारी करत आहे. मात्र, भाजप सरकारच्या गैरव्यवस्थापनाला लोक कोरोनापेक्षाही जास्त वैतागतले आहेत,अशी टीका समाजवादी पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील लोकांना भाजपने दु:खाच्या खाईत लोटले असल्याची टीकाही त्यांनी केली.People are more annoyed with BJP than Corona, criticizes Akhilesh Yadav
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : भारतीय जनता पक्षा उत्तर प्रदेशात निवडणुकांची तयारी करत आहे. मात्र, भाजप सरकारच्या गैरव्यवस्थापनाला लोक कोरोनापेक्षाही जास्त वैतागतले आहेत,
अशी टीका समाजवादी पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील लोकांना भाजपने दु:खाच्या खाईत लोटले असल्याची टीकाही त्यांनी केली.
अखिलेश यादव म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारच्या गैरव्यवस्थानामुळे आणि बेशिस्त कारभारामुळे लोकांना कोरोना आणि ब्लॅक फंगसवर उपचार मिळणे अवघड झाले आहे. अनेकांचे प्राण त्यामुळे गेले आहेत.
उत्तर प्रदेशातील सत्ता आपल्या हातातून निसटून चालली असल्याची जाणीव झाल्यामुळेच आता भाजपाच्य नेत्यांच्या दिल्ली-लखनऊ वाऱ्या सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष आणि राष्टीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेही सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाहीत.
त्यामुळे ते सध्या निष्क्रिय झाले आहेत. भारतीय जनता पक्षावर अत्यंत वाईट वेळ आली आहे. प्रथमच उत्तर प्रदेशातील एक नेता दिल्लीला डोईजड झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात खळबळ उडालेली आहे. नेत्यांमधील वाद मिटविण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.
उत्तर प्रदेशचे सरकार कोरोनाबाबत चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहे. सरकारमध्ये गोंधळ आहे. ते पूर्ण अपयशी ठरले आहेत. परंतु, आता लोकांना फसविता येणार नाही असे
सांगून अखिलेश यादव म्हणाले, २०२२ च्या निवडणुकांत भाजपाला घरी बसविण्याचे ठरविले आहे. समाजवादी पार्टीचे सरकार उत्तर प्रदेशात येणार आहे याबाबत कोणतीही शंक नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App