अखिलेश यादव यांची दादागिरी, सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना पळून पळून मारले

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. यावेळी पत्रकारांना शिवीगाळ करण्यात आली. एका पत्रकाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Akhilesh Yadavs security men beated Journalist


विशेष प्रतिनिधी

मुरादाबाद : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. यावेळी पत्रकारांना शिवीगाळ करण्यात आली. एका पत्रकाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीतील एका हॉटेलमध्ये अखिलेश यादव यांची पत्रकार परिषद होती. ही पत्रकार परिषद झाल्यावर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या एका पत्रकाराला सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर वाद वाढत गेला. यामध्ये समजाविण्याचा प्रयत्न करणाºया इतर पत्रकारांनाही कमांडोनी पळून पाठलाग करून मारहाण केली. पत्रकारांना एका हॉलमध्ये लपून बसावे लागले.पत्रकार परिषदेची नियोजित वेळ सायंकाळी साडेपाच वाजताची होती. मात्र, अखिलेश दोन तास उशिरा पोहोचले. रात्री आठ वाजता पत्रकार परिषद संपल्यावर एका चॅनलच्या प्रतिनिधीने त्यांना प्रश्न विचारण्यासाठी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्या पत्रकाराला धक्का देऊन खाली पाडले. त्यामुळे पत्रकार आणि सुरक्षा रक्षक यांच्यात वाद झाला. सुमारे दहा मिनिटे हा वाद चालू होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी अचानक पत्रकारांना मारहाण करायला सुरूवात केली.

पत्रकारांमध्ये पळापळ झाली. परंतु, सुरक्षा रक्षक पळून पळून पत्रकारांना मारहाण करत होते. एका पत्रकाराला जबर मारहाण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अखिलेश यादव यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षा रक्षक पत्रकारांना पाठलाग करून मारहाण करत असताना ते गप्प बसले. उत्तर प्रदेशनचे पंचायत राज मंत्री भूपेंद्र सिंह म्हणाला, माजी मुख्यमंत्र्यांच्या समोर पत्रकारांना मारहाण होणे निंदनिय आहे. लोकशाहीच्या चौथ्या खांबावरचा हा हल्ला आहे. समाजवादी पक्षाचे चरित्र काय आहे, हे यातून दिसून येते.

Akhilesh Yadavs security men beated Journalist

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*