विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या पर्सिव्हरन्स बग्गी (रोव्हर) मंगळावर उतरली त्याला मंगळावरील गणनेनुसार नुकतेच १०० दिवस झाले आहेत. तेथील फिरून मंगळावरील सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा शोध ही बग्गी घेत आहे. Parsiverance send 75 k images on earth
मंगळावरील एक दिवसाच्या चक्राला सोल म्हणतात. एक सोल म्हणजे २४ तास ४० मिनिटांचा कालावधी. पृथ्वीवरील दिवसापेक्षा तेथील दिवस किंचित मोठा असतो. या १०० दिवसांत पर्सिव्हरन्सने सुमारे ७५ हजार छायाचित्रे पृथ्वीवर पाठविली असून मंगळाच्या पृष्ठभागावरील आवाज प्रथम रेकॉर्ड केला आहे.
याशिवाय पृथ्वीला तुलनेने जवळ असलेल्या या ग्रहावर पाणी असल्याच्या खुणा व भूशास्त्राचा अभ्यासही या बग्गीच्या माध्यमातून केला जात आहे. १८ फेब्रुवारी रोजी या लाल ग्रहावरील भूमध्य रेषेच्या उत्तरेकडील जेझिरो विवराजवळ ही बग्गी उतरल्यानंतर मंगळाची अनेक अद्भूेत छायाचित्रे काढण्यात आली. या बग्गीतून पाठविलेल्या इन्जेन्युटी हेलिकॉप्टरनेही मंगळाची हवाई छायाचित्र काढून पाठविली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App