पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस निर्यात करायला नको होती, असे मत सर्वसामान्य नागरिकाने व्यक्त केले तर ते समजण्यासारखं आहे. पण महाराष्ट्रासारख्या अत्यंत प्रगत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारदेखील जेव्हा जाहीरपणे म्हणतात की, लस निर्यात करायला नको होती तेव्हा ही बाब गंभीर असते. पण अजित पवारांचे हे विधान वावदूक असल्याचे त्यांच्याच गावातल्या आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले. “We have never exported vaccines at the cost of the people in India and remain committed to do everything we can in the support of the vaccination drive in the country,” clarified Serum Institute of India (SII) chief Adar Poonawalla on Tuesday.
वृत्तसंस्था
लंडन : “मला हे पुन्हा एकदा सांगितेलच पाहिजे की भारतीयांना बाजूला ठेवून आजवर कधीच आम्ही लसींची निर्यात केलेली नाही. देशातील लसीकरण मोहिम यशस्वी व्हावी यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत आणि राहू,” असा खुलासा सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी मंगळवारी (दि. 18) स्पष्ट केले.
अँस्ट्राझेनका या बहुराष्ट्रीय कंपनीने इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत केलेल्या संशोधनातून तयार झालेल्या कोरोनावरील लसीचे उत्पादन घेण्याचे हक्क सीरमने मिळवले. त्यानुसार त्याचे उत्पादनही सीरमने सुरु केले आहे. कोव्हिशिल्ड या नावाने सीरमची लस उपलब्ध आहे. मात्र ही लस मोठ्या प्रमाणात निर्यात केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला जातो. हा आरोप खोडून काढणारे स्पष्टीकरण आदर यांनी दिले आहे. त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात दोन-तीन महिन्यात लसीकरण मोहिम पूर्ण होणे केवळ अशक्य आहे.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेली सीरम ही पुण्यात स्थापन झालेली कंपनी. पुण्यात या कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. कोरोनावरील कोव्हिशिल्ड या लसीचे उत्पादनही पुण्यातच सुरु आहे. अजित पवार देखील गेली तीन दशके पुण्याच्या राजकारणात, समाजकारणात आहेत. महत्त्वाचे म्हणजे ‘सीरम’ची स्थापना शरद पवार यांचे कॉलेज जीवनातील मित्र सायरस पूनावाला यांनी केली. स्थापन केली. शरद पवार आणि पूनावाला ‘फॅमिली फ्रेंड’ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांना लस निर्यातीबद्दल बेछूट विधान करण्यापूर्वी पूनावाला यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेता आली असती. पण तसे घडले नाही. अखेरीस सायरस यांचे पुत्र आदर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रामुळे अजितदादांच्या वक्तव्यातील हवा निघून गेली.
‘सीरम’ने म्हटले आहे की, अँस्ट्राझेनकाच्या कोविड-19 वरील लसीचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस इतर देशांना या लसीची निर्यात सुरु होईल. कोरोना लसीच्या उत्पादनाच्या बाबतीत सीरमचा समावेश सध्या जगातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान सीरम आणि भारत बायोटेक या दोन भारतीय कंपन्यांनी कोरोनावरील लसीचे उत्पादन सुरु केल्याने जगातील अनेक देशांनी भारताकडे कोरोना लसीची मागणी केली होती. त्यानुसार भारताने आत्तापर्यंत 6.6 कोटी लसींची निर्यात केली. बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, अफ्रिकेतील अनेक देश तसेच दक्षिण अमेरिकेतील काही देशांना ही लस भारताने पाठवली.
‘सीरम’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाचा गोषवारा असा –
We have never exported vaccines at the cost of the people in India and remain committed to do everything we can in the support of the vaccination drive in the country,” clarified Serum Institute of India (SII) chief Adar Poonawalla on Tuesday.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App