वृत्तसंस्था
मुंबई : जगभर दबदबा असलेली रिलायन्स जिओ आता आंतरराष्ट्रीय सबमरीन केबल सिस्टम बनवित आहे. रिलायन्स जिओ पुढील पिढीच्या दोन सबमरीन केबल टाकत आहे. हे भारत आणि संपूर्ण भारतीय क्षेत्राच्या डेटा गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. जिओने यासाठी जागतिक दर्जाचे सबमरीन केबल सप्लायर सबकॉमशी करार केला आहे. Reliance jio connecting world with submarine system
ही वेगवान प्रणाली सुमारे १६,००० किमी अंतरासाठी २०० TBPS पेक्षा अधिक क्षमता प्रदान करेल. आयएएक्स केबल सिस्टम जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताला आशिया पॅसिफिकच्या बाजारपेठेशी जोडेल ज्यामुळे मुंबई, चेन्नई, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरला एक्स्प्रेस कनेक्टिव्हिटी ने जोडता येईल.
इंडिया-एशिया-एक्सप्रेस (आयएएक्स) प्रणाली भारत पूर्वेकडून सिंगापूर आणि त्यापलीकडे जोडेल, तर भारत-युरोप-एक्सप्रेस (आयएक्स) प्रणाली भारत मध्य-पूर्वेला आणि पश्चिमेला युरोपला जोडेल. आयएएक्स आणि आयएक्स भारत आणि भारताबाहेर डेटा आणि क्लाउड सेवा वितरित करण्याची क्षमता वाढवतील. २०१६ मध्ये जिओ लाँच झाल्यापासून, डेटा आकडेवारीत भरभराट झाली आहे. डेटा वापराच्या वाढीमुळे भारत आज आंतरराष्ट्रीय डेटा नेटवर्क नकाशावर उदयास आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App