महाराष्ट्रातील वास्तव माहिती लपवून उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडून कौतुक करून घेतले. मनाचा आतला आवाज तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट असेही त्यांनी म्हटले आहे. It is unlikely that the Prime Minister will appreciate the situation in Maharashtra, says BJP attack on CM’s office
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील वास्तव माहिती लपवून उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडून कौतुक करून घेतले. मनाचा आतला आवाज तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारकचं कौतुक करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलाय. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही पंतप्रधान मोदी राज्य सरकारकचं कौतुक करत आहेत आणि फडणवीस मात्र टीका करत आहेत, असा टोला लगावलाय.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढविताना म्हटले आहे की, येथे बिचारे नितीन राऊत असो की पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असो की अजून त्यांच्या पत्राचीही कुणी दखल घेत नाही तरी सचिन सावंत मात्र बेगाने शादी में नाचत राहतात. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्राचाह्यलगता है निशाना सही जगह लगा है. स्वत:च उदोउदो करत फिरायचं., आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ढकलायच, ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे.
सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं! कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती?
उपाध्ये म्हणाले, आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं, या सारखं पंतप्रधानानी यांचं कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट! शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला का कोण जाणे? पण टोपेंनी जालन्यात जास्त लस दिल्याबद्दल जो खुलासा मागितला, त्यावर जयंत पाटील यांनी बोलायला हवे होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App