Uddhav Thackeray for PM; भाजपला टोला हाणत राऊतांनी नाशकातून मुख्यमंत्र्यांनाही दिला “फिल”; म्हणाले, उध्दव ठाकरे पंतप्रधान झाले तर…!!

विनायक ढेरे

नाशिक – शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांचा आजचा नाशिक दौरा “फिल” देणारा ठरला… निमित्त नाशिक महापालिकेच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणूकीच्या बैठकीचे होते… त्यात त्यांनी नाशिक महापालिकेत शिवसेना स्वबळावर सत्तेवर आल्याचा “फिल” घेतला… बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना तो फिल देण्याऐवजी ज्येष्ठ नेते शरद पवारांना यूपीएचे चेअरमन केल्याचा “फिल” दिला. Uddhav Thackeray good chioce for PM, suggests sanjay raut in nashik

एवढ्यावरच राऊत थांबले नाहीत, त्यांनी आपल्या पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही एक वेगळा “फिल” देऊन टाकला… भाजपला टोला हाणताना, राऊतांनी उध्दव ठाकरे यांना पंतप्रधान झाल्याचा “फिल” देऊन टाकला.उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पंतप्रधान होऊन दिल्लीत गेले तर आम्हालाही त्यांना भेटण्यासाठी तिथे जावे लागेल, असा खोचक टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना हाणला. यातूनच त्यांनी उध्दव ठाकरेंना पंतप्रधान झाल्याचा “फिल” देऊन टाकला.

सचिन वाझे – मनसुख हिरेन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर वाझे प्रकरणाचा तपास एटीएसकडून ‘एनआयए’कडे गेला. फडणवीसांच्या या दिल्ली वारीबद्दल विचारले असता राऊतांनी वरील उत्तर देत फडणवीसांना टोला हाणला. एटीएस सक्षम असताना राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. एनआयए’ला आणण्याची घाई करायला नको होती. एनआयएकडे तपास गेल्यामुळे राज्य सरकारला धक्का वगैरे बसलेला नाही. त्यांना जो तपास करायचा आहे तो करू द्या. कोणीही आलं आणि कोणत्याही पद्धतीनं तपास केला तरी सत्य बाहेर येईलच. महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत, असा दावाही संजय राऊतांनी केला.

Uddhav Thackeray good chioce for PM, suggests sanjay raut in nashik

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*