Puducherry Assembly Election 2021 Result : पुडुचेरीमध्ये रंगास्वामी -नारायणसामी यांच्या नेतृत्वाची कसोटी

विशेष प्रतिनिधी

पुडुचेरी : पुडुचेरी या केंद्र शासित प्रदेशात 30 जागांसाठी घेतलेल्या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. 323 उमेदवार रिंगणात आहेत. ही लढत प्रामुख्याने अखिल भारतीय एनआर कॉंग्रेस-भाजप युती माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात आणि कॉंग्रेस-द्रमुक यांनी केलेल्या आघाडीत आहे. एग्जिट पोलमध्ये रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीच्या विजयाचा अंदाज आहे. Puducherry Assembly Election 2021 Result

मतमोजणीसाठी तब्बल 1,382 कर्मचारी तर सुमारे 400 पोलिस कर्मचारी सुरक्षा कर्तव्यावर आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता टपाल मतपत्रिकांची मतमोजणी प्रथम सुरू होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मतदान मोजणी होणार आहे.



पुडुचेरी येथे एकूण विधानसभेच्या एकूण 33 जागा असून त्यापैकी 3 सदस्य नामनिर्देशित आहेत. अशा प्रकारे केवळ 30 जागांवर निवडणुका घेतल्या जात आहेत. एन रंगसामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआरसी १६ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उर्वरित १४ जागांवर भाजपाने नऊ आणि एआयएडीएमके ५ जगावर मैदानात आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेस १४जागांवर निवडणूक लढवत असून, त्या जागेवर अपक्षांना पाठिंबा दर्शविला जात आहे, तर त्याचे मित्रपक्ष द्रमुक व अन्य पक्ष 13 जागांवर निवडणूक लढवित आहेत. येथे कमल हासन अभिनेता-राजकारणी झालेले कमल हसन यांचा पक्ष रिंगणात आहे.

मागील निवडणुकीत कॉंग्रेसने निम्म्या जागा जिंकल्या

मागच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली होती. पुडुचेरीच्या-33-सदस्यांच्या विधानसभेत कॉंग्रेसने १५ जागा जिंकल्या, तर द्रमुकने तीन जागा जिंकल्या. अशाप्रकारे व्ही. नारायणसामी मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांचे सरकार निवडणुकांपूर्वी 22 फेब्रुवारीला पडले. अशा परिस्थितीत कॉंग्रेस पुन्हा राज्यात सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे.पण एनडीएचे मोठे आव्हान काँग्रेस समोर आहे.

Puducherry Assembly Election 2021 Result

महत्वाच्या  बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात