Puducherry Assembly Elections: Congress cut ticket of former Chief Minister Narayanasamy

Puducherry Assembly Elections : काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचेच कापले तिकीट, नारायणसामींना मोजावी लागली सरकारला पडण्याची किंमत!

माजी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यंदाच्या विधानसभा निवडणुका लढणार नाहीत, असे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी (एआयसीसी) चे प्रभारी पुडुचेरी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. गुंडू राव यांच्या म्हणण्यानुसार नारायणसामी निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज पाहतील. Puducherry Assembly Elections: Congress cut ticket of former Chief Minister Narayanasamy 


विशेष प्रतिनिधी

पुद्दुचेरी : माजी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यंदाच्या विधानसभा निवडणुका लढणार नाहीत, असे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी (एआयसीसी) चे प्रभारी पुडुचेरी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. गुंडू राव यांच्या म्हणण्यानुसार नारायणसामी निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज पाहतील.

पुडुचेरी विधानसभा निवडणूक 2021च्या अनुषंगाने कॉंग्रेस पक्षाने 14 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पी. सेल्वानंदन, एम. कन्नन, कार्तिकेयन व रमेश प्रेमबेट हे निवडणूक लढवणार आहेत. पुडुचेरीच्या 30 विधानसभा जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

30 जागांपैकी 5 जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत. कॉंग्रेसच्या नेतृत्वातील पुडुचेरी सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच कोसळले. त्यावेळी व्ही. नारायणसामी मुख्यमंत्री होते. सरकारच्या पडझडीचा फटका नारायणसामी यांनाही बसला आहे. त्यामुळेच यावेळी त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे.विधानसभेच्या बहुमत चाचणीपूर्वी नारायणसामी यांनी 22 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला होता. विधानसभेत 33 आमदार आहेत, ज्यापैकी 3 नामनिर्देशित आहेत. तत्पूर्वी, कॉंग्रेसचे 5 आमदार आणि डीएमकेच्या एका आमदाराने राजीनामा दिला होता. 23 फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारायणसामी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला.

2016च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. ऑल इंडिया एनआर कॉंग्रेसला 8 जागा, एआयएडीएमकेला 4 आणि द्रमुकला 2 जागा मिळाल्या होत्या. मागील निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी एआयएनआर कॉंग्रेस, भाजप आणि अण्णाद्रमुक आघाडीला मोठा विजय मिळताना दिसून येत आहे. सर्वेक्षणात भाजपची युती कॉंग्रेसच्या पुढे असल्याचे दिसून आले आहे.

Puducherry Assembly Elections: Congress cut ticket of former Chief Minister Narayanasamy

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*