विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऑक्सिजनचा हाहाकार कायम असून जयपूर गोल्डन रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागातील गंभीर अवस्थेत असलेल्या २५ रुग्णांचा एका रात्रीत केवळ ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तडफडून मृत्यू झाल्याचे समजते.Oxygen shortage in all hospitals in Delhi
दुसरीकडे लोकनायक जयप्रकाश, राजीव गांधी, मॅक्स, सरोज आदी रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या आणीबाणीबाबत केंद्र व राज्यातील यंत्रणांना कळकळीची विनंती केली आहे.
खुद्द भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सनेही काल रात्रीपासून अतिदक्षता विभागामध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेणे बंद केले होते पण हे निर्बंध काही काळासाठीच होते. जयपूर गोल्डन रुग्णालयातील २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्या
पाठोपाठ यातील आणखी २०० रुग्णांचेही प्राण धोक्यात आले होते. मात्र यंत्रणेने धावाधाव करून रुग्णालयात केवळ अर्धा तास पुरेल इतका ऑक्सिजन राहिलेला असताना एक ऑक्सिजन टँकर आणला आणि या शेकडो जणांचे प्राण वाचले.
दिल्लीतील संसर्ग काही केल्या आटोक्यात येत नसल्याने सोमवारी (ता २६) संपणारा लॉकडाउन आणखी आठ दिवसांसाठी वाढविण्यात यावा, अशी विनंती दिल्लीतील प्रतिष्ठित व्यापारी संस्थांनी केली आहे.
ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत दिल्लीतील बहुतांश रुग्णालयांनी हतबलता व्यक्त केल्याने रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र व राज्याने ऐनवेळी माघार घेतल्याने अनेक रुग्णालयांनी गंभीर कोरोना रुग्णांनाही घरी घेऊन जाण्यास त्यांच्या नातेवाइकांना सांगणे सुरू केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App