ऑक्सीजन वाहून नेणाऱ्या वाहनांना परमीटची गरज नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचा निर्णय


देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजनची गरज वाढली आहे. ही वाहतूक सुलभ व्हावी यासाठी ऑक्सीजन   वाहून नेणाऱ्या वाहनांना परमीटची गरज नसल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हा निर्णय लागू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.Oxygen-carrying vehicles do not need permits: Nitin Gadkari


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजनची गरज वाढली आहे. ही वाहतूक सुलभ व्हावी यासाठी आक्सीजन वाहून नेणाऱ्या वाहनांना परमीटची गरज नसल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हा निर्णय लागू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.



कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सध्या सर्वत्रच ऑक्सीजनची गरज वाढली आहे. ठिकठिकाणांहून ऑक्सीजन आणावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतऑक्सीजन सिलेंडर वाहून नेणाºया वाहनांना परमीटची गरज नाही. यासाठी मोटार वाहन कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

राज्यांमधील आणि शहरांमधील ऑक्सीजनची वाहतूक सुलभ होणार आहे. यामुळे कोरोनाविरुध्दचा आपला कोरोनाविरुध्दचा लढा आणखी मजबूत होणार आहे. यासाठी गुरूवारीच अधिसूचना काढण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.

कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सीजनची गरज भासते. मात्र, महाराष्ट्रासारख्या राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी ऑक्सीजनचे उत्पादन आत्तापर्यंत होत होते. परंतु, सध्या ८० टक्के आक्सीजन हा आरोग्य सेवांसाठी वापरला जात आहे. त्यामुळे इतर राज्यांतूनही ऑक्सीजन आणण्याची गरज भासत आहे.

Oxygen-carrying vehicles do not need permits: Nitin Gadkari

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात