नितीन गडकरींकडून महाराष्ट्राला भरभरून दान, रस्त्याच्या कामांसाठी २७८० कोटी रुपयांची घोषणा


केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला भरभरून दान दिले आहे. राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या या कामांसाठी कोट्यावधींचा निधी जाहीर करण्यात आलाआहे. महाराष्ट्रातील विविध रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 2780 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. Nitin Gadkari announces Rs 2780 crore for roads in Maharashtra


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला भरभरून दान दिले आहे. राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या या कामांसाठी कोट्यावधींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 2780 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

नितीन गडकरींनी गुरुवारी राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांच्या कामांविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. प्रगती का हायवे हा हॅशटॅग करत त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या रस्त्यांची कामसाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याचे जाहीर केले. यामध्ये विशेषत: कोकणातील रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय
जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 753 जे च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये मंजूर करण्यात आहे आहे. हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी केला जाणार आहे.



राष्ट्रीय महामार्ग 752 आयवरील वातूर ते चारथाना दरम्यान असलेल्या रस्ते कामासाठी 228 कोटी रुपये खर्च केले जाणार. गडचिरोली तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 353 सीवरील 262 किमी ते 321 किमीच्या अंतरामध्ये 16 लहान मोठे पूल बांधले जातील. यासाठी 282 कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

तारीरी- गगनबावडा -कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग 166 जीवरील रस्ते कामासाठी 167 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 753 च्या दोन पदरी रस्त्याचे बांधकाम केले जाईल. यासाठी 282 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नागपुरातील आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधला जाईल. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाण पूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एकूण 478 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग 361 एफच्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी 222 कोटी 44 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी 188 कोटी 69 लाख रुपये मंजूर केले आहेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग 63 चा भाग असणार आहे. आमगाव गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 543 साठी 239 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर झाले आहेत.

Nitin Gadkari announces Rs 2780 crore for roads in Maharashtra


आणखी बातम्या वाचा

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात