Give A Bed Or Kill Him : कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अवघ्या देशाबरोबरच महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, अनेकांना बेडसाठी वणवण करावी लागतेय. अशीच एक घटना चंद्रपुरातून समोर आली आहे. कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या आपल्या वडिलांना बेड मिळावा यासाठी मुलाने रुग्णालयात टाहो फोडलाय. वडिलांना एकतर बेड द्या किंवा त्यांना सरळ इंजेक्शन देऊन जिवे तरी मारा, असे हा तरुण म्हणतोय. या दृश्यामुळे अनेकांच्या काळजाचं पाणी – पाणी झालं. Chandrapur Man Pleaded Heart-Rending For His Covid-19 Infected Father Says Give A Bed Or Kill Him
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अवघ्या देशाबरोबरच महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, अनेकांना बेडसाठी वणवण करावी लागतेय. अशीच एक घटना चंद्रपुरातून समोर आली आहे. कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या आपल्या वडिलांना बेड मिळावा यासाठी मुलाने रुग्णालयात टाहो फोडलाय. वडिलांना एकतर बेड द्या किंवा त्यांना सरळ इंजेक्शन देऊन जिवे तरी मारा, असे हा तरुण म्हणतोय. या दृश्यामुळे अनेकांच्या काळजाचं पाणी – पाणी झालं.
चंद्रपुरात कोरोनामुळे गंभीर झालेल्या आपल्या वडिलांवर उपचार व्हावेत यासाठी तरुणाने 24 तासांपासून चंद्रपूर तसेच तेलंगणातील अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवले. पण वडिलांना कुठेच बेड मिळाला नाही, यामुळे अखेर वैतागून तरुणाने एकतर माझ्या वडिलांना बेड द्या किंवा त्यांना थेट इंजेक्शन देऊन जिवे तरी मारा, असे हा तरुण म्हणतोय.
24 घंटे चक्कर लगाए, कहीं बेड नहीं! बुज़ुर्ग मरीज़ के बेटे की गुहार, ‘या बेड दो या इंजेक्शन देकर मार दो!’ महाराष्ट्र के चंद्रपुर का हाल. pic.twitter.com/ZzxhlnzdZL — Puja Bhardwaj (@Pbndtv) April 14, 2021
24 घंटे चक्कर लगाए, कहीं बेड नहीं!
बुज़ुर्ग मरीज़ के बेटे की गुहार, ‘या बेड दो या इंजेक्शन देकर मार दो!’
महाराष्ट्र के चंद्रपुर का हाल. pic.twitter.com/ZzxhlnzdZL
— Puja Bhardwaj (@Pbndtv) April 14, 2021
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंद्रपुरातील रहिवासी सागर किशोर नहारशेटीवार यांचे वडील गंभीर आजारी आहेत. अशा परिस्थितीत मुलाने त्यांच्या उपचारासाठी महाराष्ट्र तसेच तेलंगणातील अनेक रुग्णालयांना भेट दिली, पण त्यांना उपचारांसाठी बेड मिळू शकला नाहीत. उपचारांसाठी सागरही वडिलांसह मुंबईहून थेट 850 कि.मी. अंतरावरील चंद्रपूरला पोहोचला, पण येथील रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे तेथील आरोग्य सुविधांवरही तीव्र परिणाम झाला, ज्यामुळे रुग्णालये 24 तास बंद राहिली.
माध्यमांशी बोलताना सागरने सांगितले की, मी दुपारी तीन वाजेपासून चकरा मारतोय. सर्वात आधी चंद्रपुरातील वरोरा रुग्णालयात गेलो, पण तेथे बेड नव्हता. यानंतर अनेक खासगी रुग्णालयांमध्ये गेलो, तेथेही जागा नव्हती. रात्री दीड वाजता आम्ही तेलंगणाकडे निघालो. तेथे तीन वाजता पोहोचलो. पण तेथेही उपचार मिळू शकले नाहीत. यामुळे सकाळी महाराष्ट्रात पुन्हा परत आलो. सध्या माझे वडील रुग्णवाहिकेत आहेत.
आपल्या वडिलांना रुग्णवाहिकेत त्रास होताना पाहून सागर खूप दुःखी झाला. त्यांने सांगितले की, रुग्णवाहिकेत बरेच तास घालविल्यानंतर आता माझ्या वडिलांचा ऑक्सिजन संपू लागला आहे. यानंतर सागरने एक अतिशय हृदयस्पर्शी विनंती केली. तो म्हणाला माझ्या वडिलांना बेड द्या किंवा इंजेक्शन देऊन ठार करा. मी या स्थितीत त्यांना घरी नेऊ शकत नाही.
Chandrapur Man Pleaded Heart-Rending For His Covid-19 Infected Father Says Give A Bed Or Kill Him
महत्त्वाच्याा बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App