Atmanirbhar Bharat In Defense Sector : जे मागच्या 73 वर्षांत घडले नाही, ते मोदी सरकारमुळे देशात घडत आहे. संरक्षणासाठी एवढे दिवस आपला देश इतर राष्ट्रांवर विसंबून होता. परंतु आता आत्मनिर्भरतेचा संदेश देणाऱ्या मोदी सरकारने या दिशेने पावले टाकायला सुरुवातही केली आहे. डीआरडीओने खासगी क्षेत्रालाही मिसाइल निर्मितीला परवानगी दिली आहे. यामुळे आता देशातील खासगी कंपन्या भारतीय जवानांना मजबूत करण्याचे काम करू शकतील. अशाच प्रयत्नांतून भारत शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, हे निश्चित. Atmanirbhar Bharat in defense sector, DRDO opens up missile production partnership for Indian private sector
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जे मागच्या 73 वर्षांत घडले नाही, ते मोदी सरकारमुळे देशात घvडत आहे. संरक्षणासाठी एवढे दिवस आपला देश इतर राष्ट्रांवर विसंबून होता. परंतु आता आत्मनिर्भरतेचा संदेश देणाऱ्या मोदी सरकारने या दिशेने पावले टाकायला सुरुवातही केली आहे. डीआरडीओने खासगी क्षेत्रालाही मिसाइल निर्मितीला परवानगी दिली आहे. यामुळे आता देशातील खासगी कंपन्या भारतीय जवानांना मजबूत करण्याचे काम करू शकतील. अशाच प्रयत्नांतून भारत शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, हे निश्चित.
DRDOने खासगी क्षेत्रातील कंपन्यांना क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित आणि तयार करण्यास परवानगी दिली आहे. देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षणाच्या बाबतीतही भारत आत्मनिर्भर व्हावा, असाही यामागे हेतू आहे.
DRDO opens up missile production partnership for Indian private sector Read @ANI Story | https://t.co/s9uHq03xyD pic.twitter.com/IR6m2F5x2N — ANI Digital (@ani_digital) April 6, 2021
DRDO opens up missile production partnership for Indian private sector
Read @ANI Story | https://t.co/s9uHq03xyD pic.twitter.com/IR6m2F5x2N
— ANI Digital (@ani_digital) April 6, 2021
डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले की, “डेव्हलपमेंट कम प्रॉडक्शन पार्टनर (डीसीपीपी) कार्यक्रमांतर्गत आम्ही खासगी क्षेत्राला आमच्याबरोबर क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्यास परवानगी दिली आहे.”
ते पुढे म्हणाले, “खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी सहभागासाठी मोठा उत्साह दर्शविला आहे. व्हर्टिकली लाँच करण्याच्या शॉर्ट-रेंज सर्फेस टू एअर मिसाईल (VL-SRSAM) प्रकल्पासाठीही बोली लावण्यात आल्या आहेत.”
नरेंद्र मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पांतर्गत हा प्रयत्न केला जात आहे. अलीकडेच डीआरडीओने संरक्षण क्षेत्रात देशाला एक चांगली बातमी दिली. डीआरडीओने या महिन्यात एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञानाची शेवटची चाचणी पूर्ण केली आहे. भारतीय पाणबुड्यांना आणखी प्राणघातक बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे यश मानले जाते, कारण जगातील काही विकसित देशांमध्येच हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणबुड्यांचा जोरात आवाज होणार नाही, शत्रूला त्यांचा सुगावाही लागणार नाही.
Atmanirbhar Bharat in defense sector, DRDO opens up missile production partnership for Indian private sector
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App