विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपुरम – पंतप्रधान जिथे जातात, तिथे काँग्रेसमुक्त भारताचा नारा देतात. सकाळी उठल्यावर तसेच रात्री झोपतानाही ते काँग्रेसमुक्त भारत म्हणतात. पंतप्रधान माकपमुक्त भारत का म्हणत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. Rhaul Gandhi targets PM Modi
पंतप्रधानांना डाव्या पक्षांबद्दल समस्या नसून केवळ काँग्रेसबद्दलच आहे. काँग्रेस एकत्रित करणारा पक्ष आहे तर डावे पक्ष फुट पाडतात, असा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत ते म्हणाले की, प्रत्येकाला एकत्रित करणाऱ्यापासून आपल्याला धोका आहे, हे ते ओळखतात. संघ डाव्यांप्रमाणेच समाजाचे विघटन करत आहे. डाव्याची विचारप्रणालीहीही हिंसेची आहे. मात्र, काँग्रेसने कधीही संताप, द्वेष पसरविला नाही.
केवळ एकीकरण केले. कोणतीही विभागणी देश, राज्याला कमकुवत करते. सर्व भारतीय समान असून देश एकत्र असतो, तेव्हाच प्रगती करतो. देशातील अनेक संस्था काँग्रेसच्या विचारधारेतून आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
केरळमध्ये डावे काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या करत आहेत. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी कधीही कोणाची हत्या केली नाही, हा काँग्रेस व डाव्यामधील फरक असल्याचेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App