Rahul Gandhi : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हॉवर्ड केनेडी स्कूलचे राजदूत निकोलस बर्न्स यांच्याशी केलेल्या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये भाजपवर मोठे आरोप केले असून अमेरिकेच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बर्न्स यांच्याशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले की, भाजपने देशातील महत्त्वाच्या घटनात्मक संस्था आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. याच मीटिंगमध्ये राहुल गांधी म्हणाले की, जर मी पंतप्रधान असतो, तर विकास दराऐवजी नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले असते. त्यांनी विरोधी पक्षांच्या निवडणुकांतील पराभवाची कारणमीमांसा सांगताना म्हटलंय की, भाजप आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला आहे, माध्यमांवरही त्यांचे प्रभुत्व वाढले यामुळे यामुळे विरोधी पक्ष निवडणुका जिंकू शकत नाहीयेत. If I were the Prime Minister Rahul Gandhi told masterplan interaction with Ambassador Nicholas Burns from Harvard Kennedy School
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हॉवर्ड केनेडी स्कूलचे राजदूत निकोलस बर्न्स यांच्याशी केलेल्या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये भाजपवर मोठे आरोप केले असून अमेरिकेच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बर्न्स यांच्याशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले की, भाजपने देशातील महत्त्वाच्या घटनात्मक संस्था आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. याच मीटिंगमध्ये राहुल गांधी म्हणाले की, जर मी पंतप्रधान असतो, तर विकास दराऐवजी नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले असते. त्यांनी विरोधी पक्षांच्या निवडणुकांतील पराभवाची कारणमीमांसा सांगताना म्हटलंय की, भाजप आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला आहे, माध्यमांवरही त्यांचे प्रभुत्व वाढले यामुळे यामुळे विरोधी पक्ष निवडणुका जिंकू शकत नाहीयेत.
राहुल गांधींना विचारण्यात आले की, जर तुम्हाला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर तुमचे आर्थिक धोरण काय असेल? यावर राहुल गांधी म्हणाले की, मी नोकऱ्यांच्या निर्मितीवर जोर देईन. मी केवळ विकासावर केंद्रित असलेल्या विचारांऐवजी नोकऱ्यांवर केंद्रित विचाराला प्राधान्य देईन. मला असे वाटते की, आपल्याला विकासाची गरज आहे, परंतु उत्पादन, रोजगार निर्मिती आणि व्हॅल्यू अॅडिशनला चालना देण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील.
LIVE: My interaction with Ambassador Nicholas Burns from Harvard Kennedy School. https://t.co/KZUkRnLlDg — Rahul Gandhi (@RahulGandhi) April 2, 2021
LIVE: My interaction with Ambassador Nicholas Burns from Harvard Kennedy School. https://t.co/KZUkRnLlDg
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 2, 2021
राहुल गांधींनी बर्न्स यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान म्हटले की, देशातील महत्त्वाच्या संस्थांच्या अपयशामुळे लोकांना जनआंदोलन करावे लागतेय. शेतकरी आंदोलन हे त्याचेच एक उदाहरण आहे. राहुल गांधी म्हणाले की, आसाममध्ये कॉंग्रेसचा निवडणूक प्रचार करणार्या व्यक्तीने मतदान यंत्रासह भाजपच्या लोकांचा व्हिडिओ पाठविला आहे, परंतु राष्ट्रीय माध्यमांमध्ये हा मुद्दा कुठेही दिसत नाही.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षाकडून देशातील संस्थात्मक संरचना पूर्णपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत शुक्रवारी म्हटले की, निष्पक्ष राजकीय लढाई निश्चित करण्यासाठी जबाबदार संस्था आवश्यक सहकार्य देत नाहीत. अमेरिकेतील सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था हार्वर्ड केनेडी स्कूलच्या विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी ऑनलाइन संभाषणात आसाम विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आमदाराच्या गाडीतील ईव्हीएमचा उल्लेखही केला. अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
If I were the Prime Minister Rahul Gandhi told masterplan interaction with Ambassador Nicholas Burns from Harvard Kennedy School
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App