दुर्गराज रायगडावर सापडला अनमोल वारसा : शिवाजी महाराज यांच्या काळातील 350 वर्षांपूर्वीचा छत्रपती इतिहासाची साक्ष देणारा ‘ दागिना ‘


छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथील सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. वनसंपदेनं परिपूर्ण असलेल्या किल्ले रायगडावर भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने उत्खनन करण्यात येत आहे.


सुमारे 350 वर्षांपूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहासाची साक्ष देणारा खजिना सापडला आहे. Invaluable heritage found at Durgaraj Raigad: ‘Jewelry’ bearing witness to Chhatrapati history 350 years ago


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : दुर्गराज रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूच्या वाड्यात सुरू असलेल्या उत्खननात सोन्याची बांगडी सापडली. गडावर इतका मोठा सोन्याचा अलंकार पहिल्यांदाच सापडला आहे. या उत्खननात सोन्याची मौल्यवान बांगडी सापडली आहे. या संदर्भात खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी माहिती दिली.

यापूर्वी तुटलेली सोन्याची साखळी सापडली असून, सुबक नक्षीकाम असलेल्या बांगडी‌ने इतिहास संशोधक, अभ्यासक व शिवभक्तांचे लक्ष वेधले आहे.



रायगड किल्ल्यावर उत्खनन केले जात आहे. या उत्खननात अनेक दुर्मिळ आणि प्राचीन काळातील वस्तू सापडत आहेत. रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व आज पुन्हा प्रत्येयास आले.

दरम्यान, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गडास भेट देऊन बांगडीसह अन्य वस्तूंची पाहणी करत, पुरातत्त्व विभागाने केलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. खासदार संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्त्व खात्यातर्फे गडावर उत्खनन सुरू आहे.

मूर्ती, नाणी, तोफगोळे, बंदुकीच्या गोळ्या, भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौले अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र, गुरुवारी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याची बांगडी मिळाली. संभाजीराजे यांनी तत्काळ गडाला भेट देऊन या बांगडीची पाहणी केली. तसेच उत्खननात सापडलेल्या दिव्याची माहिती घेतली.

गडावर बांगडी सापडल्याची बातमी पंचक्रोशीसह इतिहास अभ्यासकांत पसरताच त्यांच्यातील उत्सुकता दाटून आली. याबाबत रायगड विकास प्राधिकरणाचे कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट वरुण भामरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘उत्खननामध्ये ही सोन्याची बांगडी मिळाली असून, तिचे वजन केलेले नाही. पुरातत्व खात्याकडून माहिती मिळाल्यावर त्याबाबत अधिक सांगता येईल.’

मागील गेल्या दोन महिन्यांपूर्वी कानातल्या रिंगादेखील आढळून आले आहे. त्यातच, ज्या वाड्यात ही सोन्याची बांगडी सापडली आहे त्याठिकाणी मोठा सरदार राहत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यामुळे, संशोधन करण्याची पुन्हा एक संधी मिळाली आहे. तर, छत्रपती घराण्याचा एक वंशज म्हणून किल्ल्यावर आढळलेली सोन्याची बांगडी ही फार मोठा शोध असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे.

Invaluable heritage found at Durgaraj Raigad: ‘Jewelry’ bearing witness to Chhatrapati history 350 years ago

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात