विशेष प्रतिनिधी
मुंबई: केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पाठिंबा असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद समोर येऊ लागले आहेत. या घडामोडीवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, शरद पवार गटाची ही भूमिका दुर्दैवी असून ती मोदी सरकारला मदत करणारी असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. Sachin Sawant
‘मोदी सरकारच्या पक्ष फोडण्याच्या षड्यंत्राला राष्ट्रवादी काँग्रेस बळी पडली’: सचिन सावंत
प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शरद पवार गटाच्या निर्णयावर खालील शब्दांत टीका केली आहे:
आघाडीत चर्चा न झाल्याची खंत: मागील अधिवेशनात ‘इंडिया’ आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र असल्यामुळे मोदी सरकारचे हे विधेयक फेटाळले गेले होते; आता याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा व्हायला हवी होती, असे सावंत यांनी म्हटले आहे.
षड्यंत्राला बळी पडल्याचा आरोप: मागील पराभवानंतर मोदी सरकारने पक्ष फोडण्याचे षड्यंत्र सुरू केले आणि दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस त्याला बळी पडली, अशी चिंता सावंत यांनी व्यक्त केली; छोट्या पक्षांवर दबाव येत असल्याची भूमिका राहुल गांधी यांनीही मांडल्याचे त्यांनी नमूद केले.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
पवार साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती: शरद पवार इतकी वर्षे धर्मनिरपेक्ष विचारांचे राजकारण करत असल्याने असा निर्णय घेण्यापूर्वी ते शंभर वेळा विचार करतील असे वाटले होते, मात्र या निर्णयामुळे मोदी सरकारला मदत होत असल्याचे दुर्दैव आहे, अशा भावना सचिन सावंत यांनी मांडल्या.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
तत्पूर्वी, रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. डिलिमिटेशन ही घटनात्मक प्रक्रिया असून ती करावीच लागते आणि त्याला पर्याय नसतो, असे शरद पवार यांनी यापूर्वीच अनौपचारिक चर्चेत सांगितले होते; “साहेब हे माझे दैवत आहेत, त्यांची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे,” असे स्पष्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी 8 खासदारांना सोबत घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती आव्हाड यांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App