पंजाबमध्ये 6 वर्षांनंतर भाजप-अकाली दल पुन्हा एकत्र! विधानसभा निवडणूक एकत्र लढणार; मुख्यमंत्रीपद अकाली दलालाच मिळणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंजाबच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली असून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल तब्बल 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली. दोन्ही पक्ष आगामी पंजाब विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असून या युतीत अकाली दल ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेत असेल; तसेच निवडणूक जिंकल्यानंतर अकाली दलाचा नेताच मुख्यमंत्री बनेल, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नसून त्यावर लवकरच चर्चा केली जाणार आहे.BJP-Akali Dal Alliance

कृषी कायद्यांमुळे तुटलेली 24 वर्षांची युती पुन्हा जुळली

भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने यापूर्वी 1997, 2007 आणि 2012 या तीन निवडणुकांमध्ये एकत्र येत पंजाबमध्ये सरकार स्थापन केले होते. मात्र, केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांच्या निषेधार्थ सप्टेंबर 2020 मध्ये 24 वर्षे जुनी ही युती तुटली होती. त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना दोन्ही पक्षांना मोठा फटका बसला होता; त्या निवडणुकीत 117 जागांपैकी अकाली दलाला केवळ 3 आणि भाजपला फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या.



‘भाजपसोबतचे आमचे नाते नख-मांसासारखे’: सुखबीर सिंह बादल

या युतीबद्दल भावना व्यक्त करताना शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल म्हणाले की, ही केवळ राजकीय युती नसून एक भावनिक आणि कौटुंबिक नाते आहे. माझे वडील म्हणायचे की ही नख-मांसाची युती आहे, जी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी निर्माण केली होती; जोपर्यंत ही युती राहिली तोपर्यंत पंजाबची प्रगती झाली आणि राज्यात शांतता नांदली. दरम्यान, पंजाब आणि देशाच्या हितासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला असून अकाली दलाच्या आगमनाने एनडीएची ताकद वाढेल; तसेच ही स्वाभाविक आघाडी हिंदू-शीख ऐक्याचे प्रतीक ठरेल, असा विश्वास भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी व्यक्त केला आहे.

BJP-Akali Dal Alliance Revived After 6 Years, Akali Dal to Get Punjab Chief Minister Post

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात