रामकुंड, त्र्यंबकेश्वरच्या ध्वजारोहणासाठी चोख नियोजन करा; शेखर सिंह यांचे निर्देश

पास व्यवस्था, वाहतूक, पार्किंग आणि गर्दी नियंत्रणावर विशेष भर

 

नाशिक,  : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारे ध्वजारोहण सोहळे सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी काटेकोर नियोजन करावे. पास वितरण, आसनव्यवस्था, वाहतूक, पार्किंग तसेच प्रवेश आणि निर्गमन मार्गांचे नियोजन वेळेत पूर्ण करून विभागांमध्ये समन्वय राखावा, असे निर्देश कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

ध्वजारोहण सोहळ्याच्या पास व्यवस्थापन समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्राधिकरणाच्या समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पास वितरण आणि आसनव्यवस्थेचे नियोजन

रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यांसाठी मान्यवर, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पास वितरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. उपस्थितांच्या संख्येचा आढावा घेऊन विभागनिहाय आसनव्यवस्थेचा आराखडा तयार करावा आणि त्याची माहिती संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.

दोन्ही ठिकाणी गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी प्रवेशद्वारे, निर्गमन मार्ग आणि बॅरिकेडिंगचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला. मुख्य मंचासमोरील जागा मोकळी ठेवणे, मान्यवरांच्या हालचालींसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आणि इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष किंवा जागा निश्चित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

वाहतूक आणि पार्किंगसाठी स्वतंत्र आराखडा

ध्वजारोहण सोहळ्यांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये आणि उपस्थितांना कार्यक्रमस्थळी सहज पोहोचता यावे, यासाठी स्वतंत्र वाहतूक व पार्किंग आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. शासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक बससेवेचा पर्याय विचारात घेऊन जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अन्य कार्यालयांशी समन्वय साधण्याचेही सूचित करण्यात आले.



वाहनतळ, बसमधून उतरण्याची ठिकाणे, प्रवेशद्वारे आणि कार्यक्रमस्थळापर्यंतचे मार्ग यांची स्पष्ट माहिती देणारा नकाशा तयार करण्यावर भर देण्यात आला. तसेच नागरिक आणि मान्यवरांना मार्गदर्शन करण्यासाठी दिशादर्शक फलक, पार्किंगची माहिती देणारे नकाशे आणि मार्गदर्शनपर अॅनिमेटेड व्हिडिओ तयार करण्याबाबत चर्चा झाली.

रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन आसनव्यवस्था, माध्यमांसाठीची जागा आणि बॅरिकेडिंगचा अंतिम आराखडा निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

गोदाआरतीसाठी स्वतंत्र गर्दी व्यवस्थापन

रामकुंड येथे सायंकाळी होणाऱ्या गोदाआरतीसाठी भाविक आणि पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. आरतीस्थळी येण्या-जाण्याचे मार्ग, बॅरिकेडिंग आणि गर्दी नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा उभारण्याबरोबरच आपत्कालीन मार्ग खुले ठेवण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.

भाविकांना सुरक्षित वातावरणात गोदाआरतीचे दर्शन घेता यावे, तसेच गर्दीमुळे कोणतीही गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

सर्व विभागांना जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणारे ध्वजारोहण सोहळे नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात. प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, पार्किंग, गर्दी व्यवस्थापन आणि नागरिकांना मार्गदर्शन या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश शेखर सिंह यांनी दिले.

ध्वजारोहण सोहळ्यांच्या व्यवस्थापनासोबतच गोदाआरतीच्या वेळीही भाविकांची सुरक्षितता आणि सोयीसुविधा यांना प्राधान्य देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

Ensure meticulous planning for the flag-hoisting ceremony at Ramkund, Trimbakeshwar; instructions from Shekhar Singh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात