समुद्रात उतरले अन् काळाने गाठले! आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगरमध्ये दुर्दैवी अंत

विशेष प्रतिनिधी

रायगड : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी (२ ऑक्टोबर) भीषण दुर्घटना घडली. समुद्रात पोहोण्यासाठी उतरलेल्या पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आळंदी येथील विनर्स अकॅडमी या खासगी क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. या सहलीत ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे एकूण ४४ जण सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थी अकरावीमध्ये शिक्षण घेत होते. दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले असताना काही विद्यार्थी समुद्रात पोहोण्याचा आनंद घेत होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी बुडाल्याची दुर्घटना घडली.



घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी बचावकार्यात मदत केली. समुद्रातून आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

४४ जणांच्या सहलीवर दुःखाचा डोंगर

आळंदी येथून ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक सहलीसाठी दिवेआगरला आले होते. मात्र, या आनंदाच्या सहलीचे रूपांतर काही क्षणांत शोकांतिकेत झाले. आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आळंदी परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. घटनेची सविस्तर माहिती घेत त्यांनी बचावकार्य आणि मदतकार्याचा आढावा घेतला. परिस्थितीवर तातडीने लक्ष ठेवण्याच्या तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

या दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रती सुनेत्रा पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतल्याचे समजते.

समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस आणि प्रशासनाकडून सुरू आहे.

Eight students from Alandi met an unfortunate end in Diveagar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात