जयपूरमध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

जयपूर : राजस्थानातील जयपूर जिल्ह्यात ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बगरू तालुक्यातील रामपुरा-कंवरपुरा गावातील जिल्हा परिषद शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांसोबत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे समन्वयक आशुतोष रांका यांनी आरोप केला की, कार्यकर्त्यांना शाळेत जाण्यापासून रोखण्यात आले आणि त्यांच्यासोबत मारहाण करण्यात आली. तसेच, कार्यकर्त्यांना ‘दहशतवादी’ आणि ‘नक्षलवादी’ अशी संबोधने देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

कार्यकर्ते शाळेची पाहणी करण्यासाठी रामपुरा-कंवरपुरा येथे पोहोचल्यानंतर काही स्थानिकांनी त्यांना शाळेत जाण्यापासून रोखल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शाळेबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आशुतोष रांका घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाल्याचा दावा करण्यात आला.

रांका यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या हल्ल्यामागे भाजपाशी संबंधित लोक असल्याचा आरोप केला. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.



‘शाळेची इमारत धोकादायक’

दरम्यान, रामपुरा-कंवरपुरा गावातील सरकारी शाळेची अवस्था अत्यंत खराब असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शाळेच्या इमारतीची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नसल्याने तिची अवस्था जीर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीऐवजी गावातील इतर खोल्यांमध्ये शिकवले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थ विष्णु कुमार शर्मा यांनी सांगितले की, पूर्वी गावात पाचवीपर्यंत शाळा होती. त्यांच्या आजोबांनी शाळेसाठी जमीन दिली होती आणि १९९९ मध्ये शाळेच्या खोल्यांचे बांधकाम झाले होते. मात्र, त्यानंतर इमारतीची योग्य देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली नाही.

सध्या शाळेच्या खोल्या जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना तिथे बसवणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे गावातील भवनाच्या दोन खोल्यांमध्ये वर्ग भरवले जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले. दोन शिक्षकांकडून सुमारे २० ते ३० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शाळेच्या दुरवस्थेचा मुद्दा आणि कार्यकर्त्यांवरील कथित हल्ला यामुळे प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे.

Cockroach Janata Party workers attacked in Jaipur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात